Mobile Blast in Air India Flight: टेकऑफ दरम्यान झाला  मोबाईलचा स्फोट; एअर इंडियाच्या विमानाचे करण्यात आले आपत्कालीन लँडिंग
Air India Flight (PC - Wikimedia Commons)

Mobile Blast in Air India Flight: एअर इंडिया (Air India) बाबत मोठी बातमी समोर येत आहे. उदयपूरहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाच्या मोबाईल फोनची बॅटरी फुटल्याने (Mobile Blast) विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. उड्डाणाच्या टेकऑफ दरम्यान प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला, त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने विमानाचे लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक-470 मध्ये हा अपघात झाला. या विमानाने उदयपूरहून दिल्लीसाठी दुपारी एक वाजता उड्डाण केले. मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एका प्रवाशाच्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. या फ्लाइटमध्ये एकूण 140 प्रवासी होते. (हेही वाचा - Air India च्या विमानात ज्येष्ठ नागरिकाला आला Panic Attack अन्...)

फोनच्या बॅटरीचा स्फोट इतका जोरदार होता की विमानात बसलेले सर्व प्रवासी घाबरले. यानंतर सर्व क्रू मेंबर्स जमले आणि त्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. आतापर्यंत विविध कारणांमुळे एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.