Historic Pig Kidney Transplant: डुक्कराची किडणी प्रत्यारोपण यशस्वी झालेले Richard Slayman यांचा मृत्यू, 62 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Kidney | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Richard Slayman Passes away: जगातील पहिले जनुकीय सुधारित डुक्कर किडनी प्रत्यारोपण (First Pig Kidney Transplant) करून इतिहास रचणारे 62 वर्षीय रिचर्ड स्लेमन यांचे निधन झाले आहे. मार्च 2024 मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन डुक्कराची किडनी प्रत्यारोपीत करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दोन वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी जाहीर केले. स्लेमन यांच्यावर मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये (Massachusetts General Hospital) चार तासांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि दोन आठवड्यांनंतर एप्रिलमध्ये त्यांना घरी सोडण्यात आले.

मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट

रिचर्ड स्लेमन यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याबाबत अद्याप निदान झाले नाही. मात्र, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयाने पुष्टी केली आहे की, स्लेमन यांच्या मृत्यूचे कारण किडनी प्रत्यारोपणाशी संबंधित नव्हते, असे वृत्त एबीसी न्यूजने वृत्त दिले आहे. मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटले आहे की, रिचर्ड स्लेमन यांच्या अचानक निधनामुळे मास जनरल ट्रान्सप्लांट टीम अत्यंत दु:खी आहे. आम्हाला त्यांच्या अलीकडील प्रत्यारोपणाचा परिणाम म्हणून कोणताही नकारात्मक परिणाम शरीरावल झाल्याचे आढळून आले नाही.

रिचर्ड स्लेमन यांचा टाइप 2 मधुमेहाशी लढा

मॅसॅच्युसेट्सच्या वेमाउथ येथील रहिवासी रिचर्ड स्लेमन यांनी प्रत्यारोपण करण्यापूर्वी अनेक वर्षे टाइप 2 मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांच्याशी लढा दिला होता. ग्राउंडब्रेक पिग किडनी प्रत्यारोपणापूर्वी, मिस्टर स्लेमन यांचा टाइप 2 मधुमेह आणि उच्चरक्तदाब व्यवस्थापित करण्याचा दीर्घ पार्श्वभूमी होती. मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल टीमने डिसेंबर 2018 मध्ये मानवी किडनी प्रत्यारोपण करण्यापूर्वी अनेक वर्षे ते डायलिसिसवर अवलंबून होते.

मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलकडून स्मरण

हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, रिचर्ड स्लेमन यांनी मानवी दात्याकडून किडनी मिळविण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले पण त्यांना त्यात यश आले नाही. त्यामुळे मे 2023 मध्ये, मिस्टर स्लेमन यांना पुन्हा डायलिसिस उपचार घ्यावे लागले. ज्यामुळे त्यांच्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम झाला. रिचर्ड स्लेमन यांच्याबाबत केलेल्या निवेदनात हॉस्पिटलने म्हटले आहे की, स्लेमन यांना जगभरातील असंख्य प्रत्यारोपण रूग्णांसाठी आशेचा किरण म्हणून पाहिले जाईल आणि झेनोट्रांसप्लांटेशनच्या क्षेत्रात पुढे जाण्याच्या त्यांच्या विश्वासाबद्दल आणि इच्छेबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. आम्ही स्लेमन यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो.

दरम्यान, प्रत्यारोपणासाठी वापरलेली मूत्रपिंड ईजेनेसिस या केंब्रिजस्थित फार्मास्युटिकल कंपनीकडून आले होती. हा अग्रगण्य अवयव CRISPR-Cas9 तंत्रज्ञानाचा वापर करून अनुवांशिकरित्या सुधारित डुकरापासून काढण्यात आला. मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या मते, अवयव बदल प्रक्रियेमध्ये विसंगत डुक्कर जीन्स काढून टाकणे आणि प्राप्तकर्त्याच्या शरीराशी सुसंगतता वाढविण्यासाठी विशिष्ट मानवी जनुकांचा परिचय करणे समाविष्ट आहे.