
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसरा सामना आज म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs BAN) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium, Dubai) खेळला गेला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा सहा विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 4 विकेट गमावून 46.3 षटकात विजय मिळवला. भारताच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो शुभमन गिल होता. तो शतकी खेळी करुन नाबाद परतला.
एकदिवसीय कारकिर्दीतील झळकावले आठवे शतक
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात दिली. या खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. रोहित 41 धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनाही मोठी खेळी करता आली नाही. पण सलामीवीर म्हणून आलेल्या गिलने क्रीजवर टिकून राहून खूप चांगली फलंदाजी केली. त्याला धावा काढण्याची घाई नव्हती आणि त्याने स्ट्राईक रोटेट करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्याने 129 चेंडूत एकूण 101 धावा केल्या. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे शतक आहे.
Sensational Shubman in prolific form! 🔥
Back to Back ODI HUNDREDS for the #TeamIndia vice-captain! 🫡🫡
Updates ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#BANvIND | #ChampionsTrophy | @ShubmanGill pic.twitter.com/gUW8yI8zXx
— BCCI (@BCCI) February 20, 2025
गिलने शिखर धवनचा विक्रम मोडला
शुभमन गिल भारतासाठी सर्वात कमी डावांमध्ये 8 शतके करणारा फलंदाज बनला आहे आणि त्याने शिखर धवनचा विक्रम मोडला आहे. त्याने फक्त 51 डावांमध्ये 8 एकदिवसीय शतके केली आहेत. तर धवनने 51 एकदिवसीय डावांमध्ये 8 शतके केली होती. विराट कोहलीने 68 डावांमध्ये 8 एकदिवसीय शतके केली. (हे देखील वाचा: Rohit Sharma Milestone: रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रचला इतिहास, 'हा' पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय)
भारतासाठी सर्वात कमी डावांमध्ये आठ एकदिवसीय शतके करणारे फलंदाज:
शुभमन गिल - 51 डाव
शिखर धवन - 57 डाव
विराट कोहली - 68 डाव
गौतम गंभीर - 98 डाव
सचिन तेंडुलकर - 111 डाव
शमीने घेतल्या पाच विकेट्स
बांगलादेशने भारतीय संघाला विजयासाठी 229 धावांचे लक्ष्य दिले. बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा त्याने फक्त 35 धावांमध्ये पाच विकेट गमावल्या. यानंतर, तौहीद हृदयॉय आणि जकार अली यांनी धावा काढण्याची जबाबदारी घेतली. तौहीदने शतक झळकावले, तर जेकरने अर्धशतक झळकावले. या खेळाडूंमुळेच बांगलादेश संघ सन्मानजनक धावसंख्या गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या.