IND vs ENG 5th Test: अंतिम टेस्ट सामन्यापूर्वी बुमराह विरोधात इंग्लिश कर्णधार रूटने बनवली ‘ही’ योजना
इंग्लंड विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

भारताविरुद्ध (India) ओव्हल कसोटीत इंग्लंडला (England) पराभव सहन करावा लागला असला तरी संघाचा कर्णधार जो रूट (Joe Root) म्हणला की कसोटी सामन्यासाठी तेथील खेळपट्टी उत्कृष्ट होती आणि त्याला घरगुती हंगामात व काउंटी सर्किटमध्ये अशा आणखी खेळपट्ट्या पाहायला आवडतील. इंग्लंडला या हंगामात जूनमध्ये न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागला होता आणि आता भारताविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत ते 1-2 ने पिछाडीवर आहेत. ओव्हल मैदानावरची विकेट सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरली, त्यानंतर त्याने फलंदाजांना धावा गोळा करण्यास मदत करण्यास सुरुवात केली. पाचव्या दिवशीही भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना बाद करत संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. पाचव्या टेस्ट सामन्यापूर्वी रूटने म्हटले की फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्याची भूक असावी आणि स्लिपवर झेल सुधारण्याची इच्छा आहे. (IND vs ENG 5th Test: टीम इंडिया इंग्लंडमधील 14 वर्षांचा वनवास मालिका विजयाने संपविण्याच्या तयारीत; MS Dhoni, गांगुली यांनीही केला होता प्रयत्न)

ओव्हलमध्ये जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) मॅचविनिंग गोलंदाजीवर रूट म्हणाला की, “त्याने चमकदार गोलंदाजी केली. तो जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. पण आम्ही यापूर्वीही त्याला चांगला खेळ केला आहे. आणि मला वाटते की हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे की एक फलंदाजी गट म्हणून आम्हाला त्याच्याविरुद्ध चांगले यश मिळाले आहे.” रूटने म्हटले की त्याच्या खेळाडूंना भारतीय वेगवान गोलंदाजाने घाबरवले नाही. “घरच्या खेळपट्टीचा फायदा नेहमीच असेल. देशातील हवामानामुळे, पावसामुळे खेळपट्टीच्या तयारीला अडथळा येऊ शकतो. पण मला विश्वास आहे की मी खरोखर चांगली कसोटी खेळपट्टी बनवण्यासाठी प्रोत्साहन देईन,” रूटने येथे ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले. भारताच्या उत्कृष्ट वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणापुढे गवताळ खेळपट्टीची तयारी करणे देखील इंग्लंडसाठी प्रतिकूल ठरेल. पाचव्या कसोटीसाठी तयार केलेली खेळपट्टी रूटने पाहिली नाही, पण गेल्या वर्षी ओल्ड ट्रॅफर्ड परिस्थितीत तीन वेळा खेळल्याची त्याला चांगली कल्पना आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीपूर्वी रूट म्हणाला, “आमच्या दृष्टीने आम्हाला इंग्लिश परिस्थिती हवी आहे. आणि या आठवड्यात आपल्याला अशीच परिस्थिती मिळेल अशी आशा करूया.”

भारताने या मालिकेत दबाव अधिक चांगल्या प्रकारे हाताळला का, असे विचारले असता रूट सहमत नव्हता. तो म्हणाला, “या मालिकेत, आम्ही आणि ते दोघेही सामन्यादरम्यान अर्ध्या तासाच्या वेळात त्याचा सामना करू शकलो नाही आणि यामुळे आमचे खूप नुकसान झाले. आम्ही 1-2 ने मागे होण्याऐवजी 3-0 ने आघाडी घेतली असती.”