भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर फोर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. रविवारी खेळ पूर्ण होऊ शकला नाही. 24.1 षटकांनंतर पावसामुळे भारतीय डावात व्यत्यय आला. यानंतर एकही चेंडू टाकता आला नाही. या सामन्यासाठी एसीसीने आधीच राखीव दिवस निश्चित केला होता. अशा स्थितीत हा सामना आज पूर्ण होणार आहे. दुपारी 4.40 वाजता सामना सुरू झाला. भारताने 24.1 षटकांपासून खेळण्यास सुरुवात केली. हा सामना 50-50 षटकांचा खेळवला जाईल. दरम्यान, राहुल-विराटची शतकी भागीदारी झाली आहे आणि भारताची धावसंख्या 200 धावांच्या पार गेली आहे. भारताचा स्कोर 229/2
That's a solid 💯- run partnership between @imVkohli & @klrahul 🙌🙌
Keep going, lads!
Live - https://t.co/Jao6lKkWs5… #INDvPAK pic.twitter.com/xIVIToKzUm
— BCCI (@BCCI) September 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)