इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 19 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी मागील सामन्यात विजय मिळवला आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना आपली विजयी घोडदौड कायम राखायची आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्लेइंग इलेव्हनवर एक नजर:-

कोलकाता नाइट रायडर्स: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती.

सनरायझर्स हैदराबाद: हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी नटराजन.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)