IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या होम टी-20 मालिकेसाठी (IND vs AUS) 15 सदस्यीय भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा (Indian Women's Cricket Team) करण्यात आली आहे. ही मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) कर्णधार तर स्मृती मानधना (Smriti Mandhana) उपकर्णधार असेल. वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर दुखापत असल्यामुळे तीची या मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही आहे. टी-20 मालिकेतील पाचही सामने मुंबईतच होतील. पहिले दोन टी-20 सामने नवी मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील, तर शेवटचे तीन सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर होतील. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत महिला टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे.

टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह ठाकूर, मेघना सिंह, अंजली सरवानी, देविका वायदा, व्ही. एस. मेघना, ऋचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल.

नेट गोलंदाज: मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एस.बी. पोखरकर, सिमरन बहादूर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)