UP Hospital Fire Video: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradeh) रामपूर जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत शनिवारी आग लागली. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या इमारतीला आग लागली ती जिल्हा रुग्णालयाच्या टीबी वॉर्डची जुनी इमारत होती. शनिवारी सकाळी 9.15 वाजता ही आग लागली. आगीनंतर घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला होता. रुग्णांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. कोणीत्या तरी रुग्णाने किंवा कर्मचाऱ्यांनी वॉर्ड इमारतीत बिडी किंवा सिगारेट फेकली असावी, त्यामुळे आग लागली असावी. (हेही वाचा-  लग्नासाठी दबाव टाकल्याने प्रियकराची आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीवर गुन्हा दाखल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)