ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स (MI vs KKR) यांच्यातील सामन्यापूर्वी केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी बातचीत करताना मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये रोहित म्हणतो, “प्रत्येक गोष्ट बदलत आहे… ते त्यांच्या हातात आहे… जे काही आहे ते माझं घर आहे, ते मंदिर आहे ते मी बनवल आहे भाऊ, माझे काय, हे शेवटचे आहे.” हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रोहित शर्माचा मुंबई इंडियन्समधील हा शेवटचा सीझन असल्याची चर्चा सुरू झाली. नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीटही करण्यात आला. आता, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहितला अशाच प्रकारचा सामना करावा लागला होता. मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीशी रोहित बोलत होता. यावेळी त्यांचे संभाषण रेकॉर्ड होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर रोहितने मजेशीर प्रतिक्रिया दिली. रोहितने हात जोडून विनंती केली, “भाऊ, ऑडिओ बंद करा. मी शपथ सांगतो की एका ऑडिओने माझी वाट लावली.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)