MI vs LSG, IPL 2024 67th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 67 वा सामना (IPL 2024) आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (MI vs LSG) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. हा सामना जिंकून मुंबई इंडियन्सला चांगला निरोप घ्यायचा आहे. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सला हा सामना जिंकून त्यांचा निव्वळ धावगती सुधारायचा आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर लखनऊने फलंदांजी करत मुंबईसमोर 215 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लखनऊ सुपर जायंट्ससाठी स्फोटक फलंदाज निकोलस पुरनने सर्वाधिक 75 धावांची खेळी खेळली. मुंबई इंडियन्सकडून नुवान तुषारा आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईचा स्टार फलंदांज रोहित शर्माने अर्धशतक झळकावले आहे.
In sublime touch tonight 👌
Rohit Sharma gets to his 5️⃣0️⃣ with a superb maximum 💪
Follow the Match ▶️ https://t.co/VuUaiv4G0l #TATAIPL | #MIvLSG pic.twitter.com/PVV51veAKi
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)