Uber Driver Masturbates In Front Of Female Passenger: कॅब ड्रायव्हरकडून महिला प्रवाशांच्या छळाची, महिलांसोबतच्या आक्षेपार्ह वर्तनाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता एका महिला प्रवाशासमोर उबर ड्रायव्हरने कॅबमध्ये चक्क हस्तमैथुन केले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या साऊथ ऑस्ट्रेलिया या राज्याची राजधानी असलेल्या ॲडलेड इथे या प्रकार घडला आहे. टायला पिमलॉट (Tayla Pimlott) या 26 वर्षीय महिला प्रवाशाने सोमवारी याहू न्यूजला तिचा भयानक अनुभव कथन केला.
तिने सांगितले की, गर्दीच्या वेळी घरी जाण्यासाठी, ‘जलद आणि शांत’ प्रवास व्हावा म्हणून तिने सीबीडी इथून उबर कॅब घेतली होती. थोड्या वेळाने समोरच्या सीटवर तिची नजर गेली व तिने जे पाहिले त्याच्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. ड्रायव्हर गाडीत हस्तमैथुन करत होता. ती पुढे सांगते, 'मला स्पष्ट दिसत होते की त्याने (उबर ड्रायव्हरने) त्याचे लिंग बाहेर काढले होते आणि तो हस्तमैथुन करत होता.’ घरी पोहोचल्यावर तिने या घटनेची माहिती पोलीस आणि उबरला दिली. अहवालानुसार, पोलिसांनी 1 ऑक्टोबर रोजी रहमान फाझेली या 29 वर्षीय तरुणाला त्याच्या असभ्य वर्तनासाठी अटक केली. त्याला कोर्टासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोषी ठरवत चार आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. (हेही वाचा: Char Dham Yatra: चारधाम यात्रेदरम्यान तरुणांनी गाडीच्या छतावर बसून केले मद्यपान; पोलिसांनी शिकवला धडा, जाहीर माफी मागायला लावली)
पहा पोस्ट-
Woman horrified as Uber driver masturbates in front of her during rush hour traffic https://t.co/Ip3j4K8mie pic.twitter.com/Yfvl40pZgI
— New York Post (@nypost) May 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)