Aiden Markram's Century: एडन मार्करामच्या शतकाचे AB de Villiers केले कौतुक; लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये टाळ्यांचा गडगडाट (Video)
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स उपस्थित होता. दक्षिणा आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या फायनलमध्ये जोकदार शतक करणाऱ्या एडन मार्करामचे कौतुक केले.
Aiden Markram's Century: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात एडन मार्करामने शानदार शतक झळकावत दक्षिण आफ्रिकेसाठी मोठे योगदान दिले आहे. एडन मार्करामच्या या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये उभा राहिला आणि टाळ्या वाडवत त्याने आनंद व्यक्त केला. दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी स्टार खेळाडू त्याच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होता. कारकिर्दीतील सर्वात मोठ्या टप्प्यांपैकी एक असलेल्या एडन मार्करामने त्याचे आठवे कसोटी शतक झळकावताच, माजी क्रिकेटपटूने त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. एडन मार्कराम आणि टेम्बा बावुमा यांच्या नाबाद 143 धावांच्या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेला ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर आणले आहे.
एबी डिव्हिलियर्सकडून एडन मार्करामच्या शतकाचे कौतुक
AB De Villiers is recording Aiden Markram's 100 celebration from the stand while giving him the standing ovation❤️🥹
GOAT has seen his team RCB winning IPL & now finally seeing his country winning an ICC trophy❤️❤️❤️❤️❤️ pic.twitter.com/jIIZW8mIkR
— Rajiv (@Rajiv1841) June 13, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 11:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

