RCB vs CSK, IPL 2024 Live Streaming: प्लेऑफच्या तिकिटासाठी बंगळुरू आणि चेन्नईमध्ये होणार जोरदार लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 7 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबी 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
RCB vs CSK, IPL 2024: आयपीएल 2024 चा 68 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात होणार आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी, 18 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरू होईल. हा सामना दोन्ही संघांसाठी नॉकआऊट सामना असेल, त्यामुळे या सामन्यात उत्कंठा भरलेली असेल. चेन्नई सुपर किंग्जने 13 पैकी 7 सामने जिंकले आहेत, तर 6 सामने गमावले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 7 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबी 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत जर त्यांनी सीएसकेला पराभूत केले आणि चांगला नेट रनरेट केला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता.
The Chronicles of MahiRat - never-ending, everlasting 💛❤️
These two legends take centre stage tonight, 6:30 PM onwards, streaming FREE only with #IPLonJioCinema#RCBvCSK #TATAIPL pic.twitter.com/ugR3D3Uo1L
— JioCinema (@JioCinema) May 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 18, 2024 03:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

