टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाच्या चौथ्या फेरीचा सामना आज कोलंबोमध्ये खेळला जात होता. केवळ भारत आणि पाकिस्तानच नाही तर जगभरातील चाहते या महान क्रिकेट सामन्यावर लक्ष ठेवून होते. पंरतु मुसळधार पावसामुळे आजचा सामना रद्द करण्यात आला आहे आणि हा सामना राखीव दिवशी म्हणजे उद्या खेळवला जाणार आहे. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानी गोलंदाजीसमोर तुटून पडले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी जोरदार पलटवार केला. गिल आणि रोहितने मिळून 13.2 षटकांत म्हणजे 80 चेंडूत शतकी सलामी दिली. यानंतर दोघांमध्ये 121 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर रोहित आणि गिल बाद झाले आणि पावसाचे आगमन होईपर्यंत टीम इंडियाने 24.1 षटकांत 2 बाद 147 धावा केल्या होत्या. विराट आणि राहुल भारताचा स्कोर पुढे घेवुन जातील.
India Vs Pakistan Day 1 called off due to rain - India 147/2 after 24.1 overs.
- India will resume from 24.1 overs with a full 50 overs game...!! pic.twitter.com/s27CM6Q7cT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)