आज कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सुपर फोरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यावरही पावसाची सावली आहे. मात्र, त्यासाठी उद्याचा राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मुसळधार पावसामुळे सामना थांबवावा लागला. सामना थांबला तोपर्यंत टीम इंडियाने 24.1 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या. सध्या केएल राहुल 28 चेंडूत 17 धावा आणि विराट कोहली 16 चेंडूत 8 धावा करत फलंदाजी करत आहे. यामध्ये पाकिस्तानचा खेळाडू फखर जमानने ग्राउंड स्टाफला मैदान झाकण्यासाठी मदत केल्या ज्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Fakhar Zaman helping the ground staff get the pitch covered. cute but bhai aap dua karo ground mein flood aa jaye, help na karo. #INDvsPAK pic.twitter.com/a3FMfrrHw0
— Dexie (@dexiewrites) September 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)