
शुभ उपाय- काळ्या रंगाचे कपडे टाळा.
शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्र दान करा.
शुभ अंक- 2
शुभ रंग- पिवळा
वृषभ (Taurus Horoscope Today): सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज केलेली योग्य गुंतवणुक फलदायी ठरेल.
शुभ उपाय- सकाळी तुळशीला नमस्कार करा.
शुभ दान- गरजूंना मदत करा
शुभ अंक- 3
शुभ रंग- लाल
मिथुन (Gemini Horoscope Today): आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. आज स्वतःचा व्यवसाय किंवा एखादे नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल.
शुभ उपाय- देवाला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा.
शुभ दान- गरिबाला अंथरुण दान करा
शुभ अंक- 6
शुभ रंग- निळा
कर्क (Cancer Horoscope Today): मनात निर्माण होणार्या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. जिभेवर ताबा ठेवा.
शुभ उपाय- गणपतीची पूजा करा.
शुभ दान- भिक्षुकाला दान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- पांढरा
सिंह (Leo Horoscope Today): घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धन आणि प्रतिष्ठेची हानी असे कृत्य करू नका. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा.
शुभ उपाय- देवाला दुधाने स्नान घाला.
शुभ दान- वस्त्र दान करा.
शुभ अंक- 1
शुभ रंग- आकाशी
कन्या (Virgo Horoscope Today): घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल.
शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.
शुभ दान- धातूची वस्तू दान करा.
शुभ अंक- 2
शुभ रंग- केशरी
तुळ (Libra Horoscope Today): जुने ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर आज मात करता येईल. कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. जोडीदाराची काळजी घ्या. प्रवास टाळा.
शुभ उपाय- शंकराची पूजा करा.
शुभ दान- प्राण्याला जेवण द्या.
शुभ अंक- 5
शुभ रंग- पोपटी
वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने अनेक योजना सुफळ होतील.
शुभ उपाय- अपशब्द तोंडातून निघणार नाही याची काळजी घ्या.
शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.
शुभ अंक- 4
शुभ रंग- जांभळा
धनु (Sagittarius Horoscope Today): आजचा दिवस शुभ असेल. नोकरीच्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यापासून काळजी घ्या. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल.
शुभ उपाय- स्नान झाल्यावर देवाची पूजा करा.
शुभ दान- शक्य असल्यास रक्तदान करा.
शुभ अंक- 5
शुभ रंग- करडा
मकर (Capricorn Horoscope Today): कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. घरातील सदस्यांचे सल्ले ऐका.
शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.
शुभ दान- गाईला जेवण द्या.
शुभ अंक- 1
शुभ रंग- लाल
कुंभ (Aquarius Horoscope Today): आज जुने गैरसमज दूर करा. मित्रांसाठी वेळ काढा. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. व्यवसायाच्या दृष्टीने मध्यम दिवस त्यामुळे मोठी गुंतवणूक टाळा.
शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.
शुभ दान- गरजूला एखादे भांडे दान करा.
शुभ अंक- 7
शुभ रंग- गुलाबी
मीन (Pisces Horoscope Today): आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी भेट होईल. दिवस आनंदात व्यतीत कराल.
शुभ उपाय- जेवणानंतर गोड खा.
शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- पांढरा