Photo Credit - File

Sankashti Chaturthi Marathi Wishes: प्रत्येक महिन्यातील चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पाला समर्पित असते. या मंगलमय दिवशी गणपतीची मनापासून पूजा आणि व्रत केल्यास आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते, अशी आपली श्रद्धा आहे. आश्विन महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला विघ्नराज संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. यंदाची चतुर्थी खूप खास आहे, कारण या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत. पंचांगानुसार, आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 10 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजून 37 मिनिटांनी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी समाप्त होईल. या दिवशी चंद्रदर्शन करण्याचा शुभ मुहूर्त रात्री 8 वाजून 6 मिनिटांनी आहे. चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांसाठी चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते, कारण चंद्र पाहिल्यानंतरच व्रत पूर्ण होते.

या पवित्र दिवसाच्या खास शुभेच्छा संदेश, SMS, Messages, GIFs च्या माध्यमातून तुमच्या प्रियजनांना पाठवून तुम्ही त्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकता. चला तर मग, या चतुर्थीच्या पावन दिनी आपल्या बाप्पाला प्रसन्न करूया! (हे देखील वाचा: Lalbaugcha Raja 2025: लालबागचा राजा आणि कोळी समाजाचा काय संबंध? विसर्जन विलंबाने 'नवसाचा गणपती'चा इतिहास चर्चेत)

रम्य ते रूप सगुण साकार,

मनी दाटे भाव पाहता क्षणभर

अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,

विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता

तू विघ्नविनाशक तूच भरलास त्रिभुवनी

अन् उरसी तूच ठायी ठायी

जन्मची ऐसे हजारो व्हावे,

ठेविण्या मस्तक तूज पायी

गणपती बाप्पा मोरया!

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया

वरदहस्त असूद्या माथी

राहूद्या सदैव छत्रछाया

गणपती बाप्पा मोरया

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी

आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…

गणपती बाप्पा मोरया!

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,

सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो

हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ हसरी असावी,

बाप्पााच्या मूर्ती नजरेसमोर असावी

मुखी असावे बाप्पाचे नाव,

सोपे होईल सर्व काम

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

विघ्नराज संकष्टी चतुर्थीसाठी पंचांग (Panchang)

  • सूर्योदय: सकाळी 06:04
  • सूर्यास्त: सायंकाळी 06:32
  • चंद्रोदय: रात्री 08:06
  • चंद्रास्त: सकाळी 09:35
  • ब्रह्म मुहूर्त: पहाटे 04:31 ते 05:18
  • विजय मुहूर्त: दुपारी 02:23 ते 03:12
  • गोधूलि मुहूर्त: सायंकाळी 06:32 ते 06:55
  • निशिता मुहूर्त: रात्री 11:55 ते 12:41