Anaya Bangar (Photo Credit- X)

Anaya Bangar: एमएक्स प्लेयरचा नवीन रियालिटी शो ‘रायझ अँड फॉल’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी स्पर्धक दररोज नवनवीन खुलासे करत आहेत. आता या शोमधील एक स्पर्धक अनाया बांगर हिच्या एका धक्कादायक वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अनायाने एका प्रसिद्ध क्रिकेटपटूने तिला सोशल मीडियावर अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप केला आहे. (हे देखील वाचा: Anaya Bangar: 'तो क्रिकेटपटू मला अश्लील फोटो पाठवायचा', संजय बांगर यांच्या मुलगी बनलेल्या अनया बांगरचा धक्कादायक आरोप)

अनाया बांगरचा धक्कादायक खुलासा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये अनायाने हा मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली, "गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मी स्वतःला सार्वजनिकरित्या 'ट्रान्सवुमन' म्हणून समोर आणले. त्यानंतर, डिसेंबर-जानेवारीमध्ये मी सोशल मीडियावर विविध कंटेंट पोस्ट करत होते. तेव्हा अचानक एका क्रिकेटपटूने मला फॉलो केले. त्याने माझ्यासोबत कोणतीही बातचीत न करता थेट आपले फोटो पाठवले."

जेव्हा दुसऱ्या एका स्पर्धकाने 'न्यूड फोटो?' असा प्रश्न विचारला, तेव्हा अनायाने 'समजून घ्या' असे उत्तर दिले. 'तो क्रिकेटर तुला ओळखत होता का?' या प्रश्नावर तिने 'त्याला सर्व लोक ओळखतात' असे म्हटले. मात्र, अनायाने अद्याप त्या क्रिकेटपटूचे नाव उघड केले नाही.

कोण आहेत अनाया बांगर?

अनाया बांगर ही माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी आहे. अनाया स्वतःही क्रिकेट खेळली आहे. मात्र, नंतर तिने आपला जेंडर ट्रान्झिशन स्वीकारून आपली नवी ओळख जगासमोर आणली. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि आपल्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते.

महिला क्रिकेट संघात खेळण्याची इच्छा

अनाया बांगडने तिच्या मुलाखतींमध्ये आणि सोशल मीडियावर सांगितले आहे की, तिला भविष्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा भाग बनायचे आहे. त्यासाठी तिने आयसीसी (ICC) आणि बीसीसीआय (BCCI) यांना ट्रान्सजेंडर खेळाडूंना संधी देण्याचे आवाहनही केले आहे. अनायाने केलेला हा खुलासा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, तो क्रिकेटर कोण होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत.