Kite Flying Safety Tips: मकर संक्रांतीचा सण म्हणजे स्त्रियांसाठी सुगड पूजन, तिळगुळ वाटणं आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांची रेलचेल घेऊन येणारा नववर्षातला पहिला सण आहे. पुरूषांना आणि मुलांना मकर संक्रांतीचं विशेष आकर्षण असते ते म्हणजे पतंगबाजीचं! गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पतंगबाजीची स्पर्धा आयोजित केली जाते. महाराष्ट्रातदेखील यंदा छोट्या मोठ्या प्रमाणात पतंगबाजीची स्पर्धा आयोजित केली जाते. मात्र पतंग उडवताना लहान मुलांसोबतच मोठया व्यक्तींनादेखील थोडी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा मोठ्या अपघातांचा सामना करावा लागू शकतो. Makar Sankranti 2020 Special: मकर संक्रांती दिवशी पतंगबाजीचा खेळामध्ये बाजी मारायला मदत करतील या खास टीप्स (Watch Video).
अनेकदा डीहायड्रेशनचा त्रास,मांज्यामुळे लहान, मोठ्या जखमा होताता त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी अशा गोष्टींपासून दूर राहणं आवश्यक आहे. Makar Sankranti 2020: 'मकर संक्रांत' नक्की का साजरी करतात; जाणून घ्या त्यामागचा इतिहास आणि महत्त्व.
मकर संक्रांती दिवशी काय काळजी घ्याल?
- पतंगबाजीसाठी तुम्ही कोणता मांजा निवडाल यावर पतंग किती वर उडणार हे ठरतं. मात्र हा काटाकाटीचा खेळ जीवावर बेतू नये म्हणून सुरक्षित मांजा निवडा. सुती मांजा वापरण्याचा सल्ला दिला जातो.
- मांजा जसा मानवी जीवनाला धोकादायक आहे तसाच तो प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या जीवाला धोकादायक आहे. त्यामुळे जखमी अवस्थेत पडलेला पक्षी दिसल्यास त्याला योग्य उपचार मिळतील याची खात्री करा.
- पतंगबाजी करताना मांज्यामुळे हाताला, बोटाला जखम होऊ नये सेफ्टी बॅन्ड बांधू शकता.
- मकर संक्रांतीच्या दिवसात संध्याकाळच्या वेळेत तुम्ही दुचाकीवरून जाणार असाल तर गळ्याजवळ स्फार्फ़, डोक्यात हेल्मेट घालून गाडी चालवा.
- लहान मुलांना टेरेसवर एकट्याने पतंग उडवायला पाठवू नका. एखाद्या मोठ्या व्यक्तीची त्यांच्यावर नजर असेल याची काळजी घ्या.
- वीजेच्या तारा असतील अशा ठिकाणी पतंग उडवणं टाळा. यामध्ये मांजा अडकल्यास शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते.
- उन्हांत मुलांना किंवा मोठ्या व्यक्तीला देखील पतंग उडवायला पाठवणं टाळा. सतत उन्हांत आकाशाकडे पाहणं डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतं. यामुळे डीहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो.
- उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून डोळ्यांवर गॉगल, चष्मा लावणं सुरक्षित आहे.
मकर संक्रांतीचा सण हा नवचैतन्याचा आहे. त्यामुळे या सणामध्ये रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी घ्या. या सणा दिवशी तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असं बोलून एकमेकांमधील कटुता कमी करण्यासाठी प्रयत्न करा.