Makar Sankranti 2020 Special: मकर संक्रांती दिवशी पतंगबाजीचा खेळामध्ये बाजी मारायला मदत करतील या खास टीप्स (Watch Video)
Kite Flying | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मकर संक्रात (Makar Sankranti 2020) काही दिवसांवर आल्यामुळे पतंगप्रेमींत आनंदाचे वातावर निर्माण झाले आहे. यामुळे पतंग आणि मांजाची विक्री कराणाऱ्या दुकानांवर गर्दी पाहायला मिळणार आहे. पंतग उडवणे ही केवळ परंपरा राहिली नसून पतंग प्रेमींना प्रोत्साहित करण्यासाठी आता अनेक ठिकाणी बक्षिससह पतंग उडवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. पतंग उडवण्याच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे,असी अनेकांची इच्छा असते. मात्र, पतंग कशी उडवतात? (How to Fly Kites) याची योग्य माहिती नसल्यामुळे अनेकांची निराशा होते. अशाच पतंगप्रमींसाठी खालील व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे.

मकर संक्रात हा सण वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो. यादिवशी अनेकजण तीळ आणि गूळाची खास मिठाई करुन सर्वांना वाटली जाते. याशिवाय नवीन वर्षाला सुरुवात झाली की, अनेकांना पतंगीचे वेध लागलेले असते. दरम्यान, काही ठिकाणी काईट फेस्टिव्हल देखील भरतात. काईट फेस्टिव्हल पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटकांची गर्दी होते. अशा प्रकारचे खेळ पाहताना अनेकांना पतंग उडण्याची इच्छा होते. परंतु, पतंग कशी उडवतात याची माहिती नसल्यामुळे काही लोक आपली इच्छा मनातच मारतात. त्याचबरोबर आपल्या प्रतिस्पर्ध्याला कसे हरवायचे हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. महत्वाचे म्हणजे समोरच्या व्यक्तीची पतंग कशी कापली जाते, याची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हिडिओ नक्की पाहा. हे देखील वाचा- Makar Sankranti 2020: मकर संक्रांती निमित्त सुरक्षितपणे पतंगबाजीचा आनंद घेण्यासाठी या टीप्स नक्की लक्षात ठेवा!

युट्यूब व्हिडिओ-

मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. संक्रांत हा सण केवळ भारतातच साजरा होतो असे नाही तर आशिया खंडातील अनेक ठिकाणी तो साजरा केला जातो. नेपाळमध्ये याला माघी किंवा माघी संक्रात, थालंड मध्ये सोंग्क्रान, लाओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिंगयान असे म्हंटले जाते. भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांती, पोंगल इत्यादी नावे आहेत. या सणाला गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये पतंगाचा सण म्हणून ओळखले जाते.