Dharmendra Dies at 89:डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात (आयसीयू) कडक देखरेखीखाली ठेवलेल्या आणि नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्याने आपले शेवटचे दिवस मुंबईत घरी घालवले. शोले अभिनेत्याच्या निधनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्रकृती पुन्हा खालावल्यामुळे अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. धर्मेंद्र गेल्या काही आठवड्यांपासून तब्येतीच्या तक्रारींमुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते आणि उपचारानंतर घरी परतले होते, मात्र प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार मुंबईतील पवन हंस/विले पार्ले येथील श्मशानभूमीत करण्यात आले असून अनेक चित्रपटतारे व मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना अंतिम निरोप दिला.
View this post on Instagram
राष्ट्रपती, पंतप्रधानांसह बॉलिवूडमधील अनेक सहकलाकारांनी सामाजिक माध्यमांवर शोकसंदेश व्यक्त करत धर्मेंद्र यांच्या निधनाला भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत असे संबोधले आहे.