Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दीन दरवर्षी ६ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त म्हणजेच त्यांच्या पुण्यतिथीला समर्पित असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले, ज्यामुळे हा दिवस बौद्ध परंपरेतील 'महापरिनिर्वाण' अर्थाने साजरा होतो, जो जन्म-मृत्यूाच्या चक्रातून मुक्ती दर्शवतो. दरवर्षी मुंबईतील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी एकत्र येऊन त्यांना श्रद्धांजली वाहतात, तर संसद भवन परिसरातील प्रेरणा स्थळावर विशेष कार्यक्रम आयोजित होतात.
महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय
बाबासाहेबांनी दलित आणि उपेक्षित वर्गांसाठी सामाजिक न्यायाची लढाई लढली आणि भारतीय संविधान तयार केले.
त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि जातिव्यवस्थेविरोधात क्रांती घडवली.
१९९० मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महापरिनिर्वाण दीन कसा केला जातो?
या दिवशी प्रतिमांना पुष्पहार घालणे, दीपप्रज्वलन करणे आणि भजन-कीर्तन होतं. राजकीय नेते आणि लाखो लोक चैत्यभूमीला भेट देतात. २०२४ मध्ये उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह विशेष श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा दिवस समता, बंधुता आणि न्यायाच्या आदर्शांना प्रेरणा देणारा ठरतो.