Kite Flying Safety Rules: मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti) सण म्हणजे तिळगूळ, हलवा, हळदीकुंकू हे सारं आलंच पण प्रामुख्याने घरातील लहान मुलांना आणि पुरूषांना या दिवशी पतंगबाजी (Kite Flying) करण्याची हौस असते. मुंबई, दिल्ली सारख्या मेट्रो शहरांमध्येही टेरेसवर पतंगबाजीचे सामने रंगतात. मात्र उत्साहाच्या भरात हा पतंगबाजीचा (Kite Flying) खेळ घातक ठरू शकतो. लहानसहान असले तरीही अपघात, इजा टाळण्यासाठी काही खास काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजे हा सण तुमच्यासोबतच इतरांसाठीही आनंददायी ठरेल. Happy Makar Sankranti 2019: मकरसंक्रांतीच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी WhatsApp Messages,Greetings, SMS, Facebook Status साठी खास मराठी शुभेच्छापत्रं!
पतंगबाजी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल ?
- पतंग उडवताना मांजा योग्य निवडणं अत्यंत गरजेचे आहे. स्वस्त आणि काटाकाटीचा खेळ सुकर करण्यासाठी अनेकदा चीनी, नायलॉनचा मांजा वापरला जातो. मात्र अशाप्रकारचा मांजा धोकादायक आहे. नागरिकांसोबतच पक्ष्यांचा जीव जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सुती मांज्याचीच निवड करा.
18004255364 किंवा 04023231440 या टोल फ्री क्रमांकावर जखमी पक्षांची माहिती देऊन तात्काळ मदत मिळवू शकता.
- अनेकदा उत्सहाच्या भरात मांजा खेचताना हाताला, बोटाला जखम होण्याची शक्यता असते. अशा जखमा टाळायच्या असतील तर बोटांमध्ये खास रबरचे सेफ्टी बॅन्ड घालूनच पतंग उडवायला बाहेर पडा. International Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश !
- वीजेच्या तारा असणार्या ठिकाणी पतंग उडवण्याचा मोह टाळा. तसेच वीजेच्या तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचाही प्रयत्न करू नका. यामध्ये शॉक लागण्याचा, इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा धोका असतो.
- मोकळ्या जागी पतंग उडवा. तसेच शहरांमध्ये इमारतीच्या टेरेसवर पतंगबाजीसाठी जाणार असाल तर लहान मुलांना एकट्याने पाठवू नका. उत्साहाच्या भरात अपघाताची शक्यता असल्याने लहानमुलांसोबत एखादी वडीलधारी व्यक्ती असेल याची काळजी घ्या.
- संध्याकाळच्या वेळेत जरी पतंग उडवणार असाल तरीही सतत आकाशात पाहून उन्हाचा त्रास होऊ शकतो. अशावेळेस चष्मा, गॉगल्स घालून बाहेर पडा.
- मकरसंक्रांतीच्या दिवसांमध्ये बाईक्सवरून बाहेर फिरत असाल तर काळजी घ्या. अनेकदा वेगात जाणार्या बाईकस्वारांना मांज्यामुळे अपघात होऊ शकतो. त्यामुळे कटाक्षाने हेल्मेट आणि मानेजवळ स्कार्फ़ घालूनच बाहेर पडा.
मकर संक्रांतीच्या दिवशी तीळगुळासोबतच गूळपोळी, तेलपोळी खाल्ली जाते. नवदांम्पत्यांसाठी मकरसंक्रांतीचा सण खास असतो. या दिवशी हलव्याच्या दागिन्यांनी दोघांनाही सजवलं जातं. काळे कपडेघालून मकर संक्रांत साजरी केली जाते. नव्या सूनबाईंचं, जावयाचं भेटवस्तू देऊन कौतुक केलं जातं.