Makar Sankranti 2019: मकर संक्रांत दिवशी काळे कपडे घालण्यामागील महत्त्व!
मकर संक्रात विशेष | (Photo Credits: Priya and Umesh Bapat, Sayali Rajadhyaksha Instagram Account)

Makar Sankranti 2019: मकर संक्रांत (Makar Sankranti) हा नववर्षातला पहिला सण आहे. तिळगूळ, पतंग, हलव्याचे दागिने, तेलपोळी, गूळपोळी यासोबतच मकर संक्रातीचे आणखी एक खास आकर्षण असते ते म्हणजे काळे कपडे. एरवी सणाला, शुभ मुहूर्तावर काळे कपडे (Black Cloths)  न घालण्याचा भारतीय संस्कृतीमध्ये अलिखित नियम आहे. पण मकर संक्रातीचा सण मात्र याला अपवाद आहे. मकरसंक्राती दिवशी हमखास काळे कपडे घातले जातात. Happy Makar Sankranti 2019:मकरसंक्रांतीच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी WhatsApp Messages,Greetings, SMS, Facebook Status साठी खास मराठी शुभेच्छापत्रं!

मकरसंक्रांतीला काळे कपडे  घालण्यामागील प्रथेचे महत्त्व ?

मकरसंक्रांत हा सण जानेवारी महिन्याच्या 14,15 तारखेला साजरा केला जातो. जानेवारी महिन्यात थंडी  असते. अशावेळेस काळ्या रंगाचे सुती कपडे घालणं फायद्याचं आहे. कारण काळ्या रंगामध्ये उष्णता शोषून अधिक काळ टिकवण्याची क्षमता असते. त्यामुळे थंडीपासून रक्षण होण्यास मदत होते. महाराष्ट्रात प्रामुख्याने मकर संक्राती दिवशी इरकलच्या काळ्या साड्या नेसल्या जातात. प्रामुख्याने नवदांपत्यांसाठी लग्नानंतर पहिल्यांदा येणारा मकर संक्रातीचा सण खास असतो. यादिवशी हलव्याच्या दागिन्यांनी दोघांनाही सजवलं जातं. मकरसंक्रात ही उत्तरायणाच्या काळात येते. यादिवशी सूर्य मकर राशी मध्ये प्रवेश करतो.  मकर संक्रांती दिवशी पतंगबाजी करताना उत्साहाच्या भरात सुरक्षेच्या 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात!

महाराष्ट्रामध्ये मकर संक्रातीचा सण भोगी, मकर संक्रात आणि तिळवण (किंक्रांत) अशा तीन दिवसात साजरी केली जाते. यामध्ये तिळाचे लाडू, बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी असे शरीरात स्निग्धता वाढवणारे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.