Bhogi 2019 :  भोगीची मिक्स भाजी कशी बनवाल? बाजरीच्या भाकरीसोबत भोगीची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे
Bhogichi Bhaji Recipe ( Photo Credits: You tube/ Ruchkar Mejwani )

Bhogichi Bhaji Recipe:  भारतीय सण आणि संस्कृती यांच्यामध्ये केवळ सेलिब्रेशन हा उद्देश नसतो तर यासोबतच आरोग्यदायी संकेतदेखील असतात. नववर्षातला पहिला सण म्हणजे मकरसंक्रात (Makar Sankranti)! मकरसंक्रातीच्या आदला दिवस भोगी (Bhogi) म्हणून साजरा केला जातो तर संक्रातीच्या पुढला दिवस क्रिंकांत (Kinkrant) म्हणून साजरा केला जातो. यंदा भोगी (Bhogi 2019) 14 जानेवारी 2019 दिवशी आली आहे. भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी (Bhogichi Bhaji ) आणि बाजरीची भाकरी (Bajari Bhakri)  करण्याची प्रथा आहे.

महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला 'खिंगाट' म्हणतात. ही भाजी- भाकरी चविष्ट असते पण त्यासोबतच हिवाळ्याच्या दिवसात त्याची चव चाखण्याचे आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. मकर संक्रांती ते रथसप्तमी दरम्यान हळदी कुंकू कार्यक्रम करण्याचं महत्त्व काय?

कशी कराल भोगीची मिक्स भाजी ?

भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे. या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहारलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो. भोगीची भाजी ही मिक्स भाजी असते त्यामुळे या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणार्‍या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो. Makar Sankranti 2019: 'ही' हटके वाण देऊन साजरी करा यंदाची मकर संक्रांत !

भोगीची मिक्स भाजी साहित्य आणि कृती -:

भांड्यामध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करा. यामध्ये शेंगदाणे, हरभरे आणि घेवडा घालून वाफा काढा. हे सारं शिजल्यानंतर त्यामध्ये भाजीची चिरलेली वांगीआणि गाजर घाला. पाण्याच्या वाफेवर हे मिश्रण मध्यम आचेवर शिजवा. भाज्या शिजताना यामध्ये चिंचेचा कोळ आणि काळा मसाला मिसळा. त्यानंतर गूळ, तिळाचा कूट, खोबरं आणि मीठ घालून भाजी नीट शिजवा.

भोगीची भाजी ही प्रामुख्यने बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरीसोबत भाजीची चव चाखणं हे केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्याला पोषक आहे. यामध्ये कफनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता टिकवून ठेवण्यास मदत होते.