Makar Sankranti 2019: काही दिवसातच नववर्षातला पहिला सण मकर संक्रांत येईल. संक्रांतीला तिळगुळ, काळे कपडे परिधान करणे त्याचबरोबर हळदी कुंकवाचाही विशेष उत्साह महिलांमध्ये पाहायला मिळतो. दरवर्षी हळदीकुंकवाला काय द्यायचं हा प्रश्न अनेकींना पडतो आणि मग आपण नेहमीच्याच वाट्या, पेले, रुमाल अशा वस्तूंकडे महिला वळतात. पण यंदा थोडासा वेगळा विचार करूया आणि पर्यावरण स्नेही व आरोग्यदायी वस्तू देऊन हळदी कुंकवाचा आनंद लुटूया. मकर संक्रांती ते रथसप्तमी दरम्यान हळदी कुंकू कार्यक्रम करण्याचं महत्त्व काय?
Natural bath loof:
आजकाल अंघोळीसाठी आपण प्लॉस्टिकचे bath loof वापरतो. प्लॉस्टिक पर्यावरणासाठी घातक असल्याचे आपण जाणतोच. मग प्लॉस्टिक ऐवजी नैसर्गिक bath loof वापरणे हा चांगला पर्याय आहे. हे bath loof ऑनलाईन उपलब्ध असून याची किंमत 60 रुपयांपासून सुरु होत आहे. तसंच हे bath loof विविध ढंगात उपलब्ध आहेत. यावर्षी 14 नाही तर, 15 जानेवारीला साजरी होईल मकर संक्रांती; जाणून घ्या पुण्यकाळ आणि सणाचे महत्व
नैसर्गिक साबण:
साबण ही अगदी रोजच्या वापरातील वस्तू. त्वचेच्या आरोग्यासाठी आपण त्याची निवड काळजीपूर्वक करतो. पण कितीही काळजीपूर्वक निवड केली तरी साबणात केमिकल्स हे असणारच. परंतु, नैसर्गिक साबण अनेक स्वरूपात उपलब्ध आहेत. त्याचा लाभ आपण नक्कीच घेऊ शकतो.
नैसर्गिक काजळ:
काजळ म्हणजे आपल्या मेकअप किटमधील अभिवाज्य भाग. अनेकजणी तर काजळ लावल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. केमिकलयुक्त काजळ ऐवजी नैसर्गिक काजळ देण्याची कल्पना अनेकींना आवडेल.
तांब्याचा चमचा:
तांब्याच्या भांड्यातून खाणं आरोग्यदायी असतं, असं म्हटलं जातं. मग या हळदीकुंकवाला तांब्याचा चमचा देऊन एक आरोग्यदायी वाण लुटुया.
खाण्यायोग्य चमचा:
हळदीकुंकवासाठी हा एक नाविण्यपूर्ण पर्याय आहे. गहू, तांदूळ, ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या चमच्यातून आपण खाऊ शकतो आणि काम झाल्यावर तो चमचा देखील पाहू शकतो. यात विविध आकार आणि प्रकार उपलब्ध आहेत. हे चमचे अगदी माफक दरात ऑनलाईन मिळतील.
Use and Reuse:
हळदीकुंकवासाठी सुपारीच्या झाडापासून बनवलेल्या वाट्या, प्लेट्स, ताट देणं हा एक उत्तम, स्वस्त, पर्यावरण स्नेही आणि आरोग्यदायी पर्याय आहे. कारण या वस्तू आपण वापरून झाल्यावर घासून परत वापरू शकतो. यात विविध आकर्षक आकार उपलब्ध असून 3-4 रुपयांना एक अशा अगदी स्वस्त दरात मिळतात.