Diwali Padwa 2020| Photo Credits: Unsplash.com

BaliPratipada 2020 Date: कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा (Bali Pratipada) किंवा दिवाळी पाडवा (Diwali Padwa). दिवाळीचा हा सण बलीच्या पूजनाचा आणि नवदांपत्यासाठी खास मानला जातो. यंदा बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा हा सण सोमवारी 16 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. या सणाच्या निमित्ताने 'इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो' अशी प्रार्थना केली जाते. दरम्यान हा दिवाळी पाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने हा मोठा शुभ मुहूर्त समजला जातो. या दिवशी सोनं किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याची प्रथा आहे. सणाच्या निमित्ताने या दिवशी देखील गोडा-धोडाचे जेवण केले जाते. Diwali 2020 Dates: यंदा दिवाळी कधी आहे? वसूबारस, लक्ष्मीपुजन ते भाऊबीज 6 दिवसांच्या दीपोत्सवात कोणता सण कधी?

बलिप्रतिपदा का साजरी केली जाते?

बळी हा असूरांचा राजा होता तर भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा मुलगा होता. राक्षसकुळात जन्मलेला हा चारित्र्यवान, विनयशील आणि प्रजादक्ष राजा होता. त्याचा दानशूर स्वभाव सर्वश्रूत होता. त्याने वाढत्या शक्तींच्या जोरावर देवांना सुद्धा पराभूत केले होते. बळीराजाला हरवण्यासाठी भगवान विष्णूंची निवड करण्यात आली. बळीराजाने एक यज्ञ केला होता. त्यामध्ये दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णू वामन अवतार धारण करत बटूवेशात बळीराजासमोर उभे राहिले. या रुपात वामनने तीन पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली त्यावेळी वामन अवतारातील विष्णूंनी प्रचंड रुप धारण करत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्ती बळीराजाने मस्तर पुढे ठेवले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवत वामनांनी त्याला पाताळाचे राज्य दिले. अत्यंत दानशूर पण दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बळीराजाला भगवान विष्णूने वामन अवतारात घेऊन पाताळात गाडल्याचा हा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. Diwali 2020 Invitation Cards in Marathi: दिवाळीच्या शुभेच्छा देत मित्रमंडळी, प्रियजनांना फराळाचं ऑनलाईन आमंत्रण देण्यासाठी खास Messages Formats!

नवदांम्पत्यांचा दिवाळसण

दिवाळी पाडवा हा नवादांमप्त्यांसाठी दिवाळसण म्हणून देखील ओळखला जातो. या दिवशी संध्याकाळी पत्नी पतीला ओवाळून त्यांच्या सुखी संसाराची कामना करते. Diwali 2020: यंदा दिवाळीच्या दिवशी 17 वर्षांनंतर सर्वार्थसिद्धि योग; पुष्य नक्षत्रापासून दिवाळी पर्यंत महत्त्वाच्या खरेदीचे 7 शुभ मुहूर्त!

व्यापारी वर्ग

बलिप्रतिपदा हा व्यापारी वर्गासाठी देखील मोठा खास दिवस असतो. लक्ष्मी पूजनानंतर येणार्‍या पाडव्याच्या दिवसापासून व्यापारी वर्गाचे नववर्ष सुरू होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण असते.

यंदा दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे दोन्ही सण एकत्र आले आहेत. त्यामुळे यंदा दिवाळी सणाची सांगता 16 तारखेला दोन्ही सण साजरे करून एकत्रच होणार आहे.