Diwali 2020 Dates: यंदा दिवाळी कधी आहे? वसूबारस, लक्ष्मीपुजन ते भाऊबीज 6 दिवसांच्या दीपोत्सवात कोणता सण कधी?
Diwali 2020 | Photo Credits: Unsplash.com

Diwali 2020 Calendar: नवरात्र (Navratri) संपल्यानंतर सार्‍यांनाच वेध लागतात ते म्हणजे दीपावली (Deepavali) अर्थात दिवाळी (Diwali)  सणाचे. दिवाळीच्या निमित्ताने घरामध्ये काना कोपरा साफ करण्यापासून अगदी पारंपारिक फराळ, आकाशकंदील, भव्य रांगोळ्या, रोषणाई यांची तयारी सुरू होते. हिंदू रीती रिवाजांप्रमाणे वसूबारस पासून दिवाळीची धूम महाराष्ट्रात सुरू होते आणि भाऊबीजेला त्याची सांगता होते. पण आता तुम्हांला पदलेला प्रश्न म्हणजे यंदा दिवाळी कधी आहे? महाराष्ट्रात दिवाळीचा दिवस म्हणजे पहिली आंघोळ. नरक चतुर्दशीला उटण्याने अभ्यंगस्नान केल्यानंतर दिवाळीच्या धामधुमीला रंगत चढायला सुरूवात होते. साधारण आठवडाभर चालणार्‍या या सणाच्या निमित्ताने दिवाळी 2020 मध्ये यंदा नरकचतुर्दशी(Narak Chaturdashi), दिवाळी पाडवा, लक्ष्मीपुजन, भाऊबीज (Bhaubeej), पाडवा(Diwali Padwa) , धनत्रयोदशी (Dhanatrayodashi) आणि वसूबारस (Govatsa Dwadashi) हे वेगवेगळे सण कधी आहेत? हे तुम्हांला ठाऊक आहे का? यंदा लॉकडाऊन असल्याने दिवाळीत देवदर्शन असो किंवा फराळावर ताव मारण्याचा बेत सार्‍यांवरह बंधनं आहेत. मग घरच्या घरी दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी जाणून घ्या यंदाच्या दिवाळसणातील वसूबारस ते भाऊबीजेपर्यंतचा सारा सणांच्या दिवसांचा क्रम!  Diwali 2020 Invitation Cards in Marathi: दिवाळीच्या शुभेच्छा देत मित्रमंडळी, प्रियजनांना फराळाचं ऑनलाईन आमंत्रण देण्यासाठी खास Messages Formats!

दिवाळी 2020 कधी आहे?

वसूबारस

ग्रामीण महाराष्ट्रात दिवाळीची सुरूवात जी घरातील गुरांची पुजा करून केली जाते. यंदा वसूबारस 12 नोव्हेंबर ला आहे.

धनतेरस

आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची पुजा करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी. यंदा हा सण 13 नोव्हेंबरला आहे. या दिवशी अपमृत्यू टाळण्याची पुजा करण्यासाठी यमदीपदान करण्याची देखील प्रथा आहे. Diwali 2020: धनतेरस च्या दिवशी का खरेदी करतात सोने-चांदी किंवा तांब्या-पितळाची भांडी? जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त.

नरक चतुर्दशी

महाराष्ट्रात दिवाळीची खरी सुरूवात म्हणजे अभ्यंगस्नान करून, कारेटे फोडून प्रतिकात्मक नरकासुराचा वध करून सण साजरा करण्याचा म्हणजेच नरक चतुर्दशी. यंदा नरक चतुर्दशी 14 नोव्हेंबरला आहे. Narak Chaturdashi 2020 Importance, Puja Vidhi And Muhurt: नरक चतुर्दशी दिवशी का केले जाते अभ्यंग स्नान, जाणून घ्या महत्व, मुहूर्त आणि पूजा विधी.

लक्ष्मीपुजन

14 नोव्हेंबर दिवशीच यंंदा लक्ष्मी पुजन देखील आहे. दिवाळीत संध्याकाळी दिवेलागणीचा वेळ म्हणजे लक्ष्मीपुजनाचा काळ. त्यामुळे संध्याकाळी लक्ष्मीपुजन केले जाते. Laxmi Pujan 2020 Date: यंदा लक्ष्मी पूजन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी.

दिवाळी पाडवा

दिवाळी पाडवा हा पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण आहे. पाडवा हा साडेतीन मुहुर्तातील अर्धा मुहुर्त आहे त्यामुळे त्याचं विशेष महत्त्व आहे. हा सण 16 नोव्हेंबर दिवशी आहे.

भाऊबीज

16 नोव्हेंबरला दिवाळी सणाची धामधूम भाऊबीजेच्या सणाने संपणार आहे. या दिवशी बहीण-भावाच्या नात्याला जपण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी प्रार्थना केली जाते. जाणून घ्या बहिण-भावाचे नाते वृद्धिंगत करणाऱ्या सणाचे महत्त्व

दरम्यान दिवाळी हा सणांचा राजा असल्याने या सणाच्या निमित्ताने खरेदी पासून खाद्यपदार्थांची मोठी तयारी असते. आता अवघ्या 15-20 दिवसांत आली असल्याने अनेक ठिकाणी घराघरामध्ये दिवाळीच्या निमित्ताने तयारीला सुरूवात झाली असेल. येते काही विकेंडस अनेक घरात झाडलोटीच्या कार्यक्रमांमध्ये जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही देखील दिवाळीच्या निमित्ताने तयारी करत असाल तर यंदा दिवाळीत कोणता सण कधी आहे याचं वेळापत्रक लक्षात ठेवूनच सुरक्षित दिवाळी साजरी करा. कोरोनाचं सावट दिवाळीवरही राहणार आहे. त्यामुळे त्याची काळजी घेऊनच घराबाहेर पडण्याचे प्लॅन्स बनवा.