Diwali Wishes In Marathi | File Image

Diwali 2020 Invitations Marathi Message Formats: दिवाळी (Diwali) हा सण आनंदाचा, जल्लोषाचा आहे. यंदा कोरोना वायरसचं सावट दीपोत्सवावर (Deepotsav) असल्याने  थोडी अधिक सतर्कता आणि दक्षता बाळगत तुम्हांला हा सण साजरा करावा लागणार आहे. दरम्यान दिवाळी यंदा विकेंडला आल्याने अनेकांना सुट्ट्या असूनही बाहेर दरवर्षीप्र्माणे एकत्र जमून भेटणं शक्य नाही. पण हळूहळू कोरोनाचा सामना करणार्‍या आपल्या सार्‍यांनाच या निमिताने खबरदारी घेत प्रियजनांची भेट नक्की घेता येईल. दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही कुटुंबाला भेटणार असाल तर प्रियजणांना, नातेवाईकांना, मित्र मंडळींना तुम्ही दिवाळी शुभेच्छा देत सणानिमित्त नक्कीच घरी भेटून फराळाला आमंत्रित करू शकता. दीपावली 2020 (Deepavali 2020) च्या निमित्ताने यंदा व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), फेसबूक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून तुम्ही आमंत्रण पाठवणार असाल तर या निमंत्रण किंवा आमंत्रण पत्रिका पाठवूनही फराळाचं आमंत्रण देऊ शकता.

दिवाळीच्या निमित्ताने काहींनी यंदा व्हर्च्युअल दिवाळी पार्टीचं देखील आयोजन केले असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा हटके अंदाजात तुम्ही दिवाळी साजरी करत असाल तर व्हर्च्युअल पार्टीचं देखील आमंत्रण वेळेत पोहचायला हवंच! मग त्यासाठी दिवाळी निमित्त मित्र आणि प्रियजनांसोबत दंगा घालण्यासाठी हे आमंत्रणाचे मेसेजेस नक्की शेअर करा. Diwali 2020 Dates: यंदा दिवाळी कधी आहे? वसूबारस, लक्ष्मीपुजन ते भाऊबीज 6 दिवसांच्या दीपोत्सवात कोणता सण कधी?

दिवाळी 2020 चं आमंत्रण मेसेज फॉरमॅट   

नमूना 1: 

शुभ दीपावली !

आपल्या नात्यातील गोडवा मिळून मिसळून साजरी करू दिवाळी

फराळ, गप्पांंसह, भेटीगाठी आणि गेम्स खेळण्यासाठी भेटू रविवारी संध्याकाळी!

अहं प्रत्यक्ष नव्हे, ऑनलाईन

खालील लिंक वर नक्की जॉईन व्हा

लिंक-

नमूना 2:

Diwali Invitation Message (Photo Credits: File Image)

नमूना 3:

चिवडा-चकली, लाडू-करंजीची लज्जत चाखण्यासाठी

आमच्या आनंदात तुमच्या उपस्थितीने आणखीन भर टाकण्यासाठी

यंदा 15 नोव्हेंबर दिवशी सायंकाळी 7 पासून आपल्या कुटुंबासमवेत

आमच्या घरी नक्की भेट द्या!

पत्ता:

दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्रात आता कोरोना रूग्णांच्या संख्या आटोक्यात आल्याचं चित्र असलं तरीही येत्या दिवाळीच्या दिवसांत आपण काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. या दिवसांमध्ये तुम्ही मित्रमंडळी, प्रियजनांना भेटण्यासाठी बाहेर पडणार असाल तरीही पुरेशी खबरदारी घ्या. लहान मुलं, वयोवृद्ध नागरिकांना जपा आणि सुरक्षितपणे दिवाळीचा सण यंदा साजरा करा. हॅप्पी दिवाळी!