Bhaubeej 2020 Date and Significance: भाऊबीज हा सण बंधू आणि बहिणीचे पवित्र नाते आणि आपुलकीचे प्रतीक जपणारा उत्सव आहे. भाऊबीज हा सण देशातील विविध राज्यात भाई दूज, यम द्वितीया, भातरू द्वितीया इत्यादी नावाने साजरा केला जातो. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेचं यमद्वितीया या दिवशी असतो. हा महाराष्ट्रात दिवाळीच्या सहाव्या दिवशी साजरा केला जातो. भाऊबीजेलाचं यमद्वितीया असंही म्हणतात. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला. म्हणून हा दिवस यमद्वितीया म्हणून साजरा करण्याची प्रथा पडली. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस 'भाऊबीज' म्हणून साजरा केला जातो.
पौराणिक कथेनुसार, भाऊबीजेच्या दिवशी कुठल्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जाऊन तिला वस्त्रालंकार देऊन तिच्या घरी भोजन करायचे असते. सख्खी बहीण नसेल, तरी कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला आपली बहिण मानून तिच्याकडे जेवण करावे. यंदा 16 नोव्हेंबरला म्हणजेचं सोमवारी दिवाळीचा सण साजरा होणार आहे. या दिवशी बहीण-भावाच्या नात्याला जपण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी प्रार्थना केली जाते. (हेही वाचा -Laxmi Pujan 2020 Date: यंदा लक्ष्मी पूजन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी)
भाऊबीज शुभ मुहूर्त -
यंदा भाऊबीजेचा शुभमुहूर्त दुपारी 1.10 मीनिटांनी सुरू होऊन दुपारी 3.18 मीनिटांपर्यंत असणार आहे.
भाऊबीज सणाचे महत्त्व -
भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला आदराने आणि प्रेमाने ओवाळते. या दिवशी बहीण आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा, यासाठी प्रार्थना करते. भाऊबीजेच्या दिवशी बहिण आपल्या भावाला 'करदोरा' देते. हा करदोरा भाऊ आपल्या कंबरेला बांधतो. महाराष्ट्रात बहिणीने आपल्या भावाला ओक्षण झाल्यानंतर करदोरा देते. (वाचा - Narak Chaturdashi 2020 Importance, Puja Vidhi And Muhurt: नरक चतुर्दशी दिवशी का केले जाते अभ्यंग स्नान, जाणून घ्या महत्व, मुहूर्त आणि पूजा विधी)
भाऊबीजेच्या दिवशी दीपदानाला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी यमाला दीपदान करण्याची प्रथा आहे. यम ही मृत्यूची देवता आहे. प्रत्येकाला मरण अटळ आहे. ही जाणीव असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याकडून वाईट कार्य व धनाचा अपव्यचं होणार नाही. यासाठी यम देवतेला प्रार्थना करायची असते. भाऊबीजेच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला औक्षण करत त्याच्या सुरक्षेसाठी करदोरा देत असते. जर एखाद्या स्त्रिला भाऊ नसेल तर त्या स्त्रीने चंद्राचे औक्षण करावे, अशी परंपरा आहे.