दिवाळी (Diwali ) सणाची सुरुवात म्हणजे वसुबारस (Vasu Baras ). दिवाळीच्या ( Diwali 2020) सुरुवातीलाच हा सण येतो. हिंदू पंचागानुसार अश्निन महिन्यातील वद्य द्वादशी दिवशी साजरा केला जाणार सण म्हणजे वसुबारस. यंदाच्या वर्षी वद्य द्वादशी ही 12 नोव्हेंबर 2020 या तारखेस येत आहे. त्यामुळे सहाजीकच यंदाची वसुबारस ?( Vasu Baras 2020) 12 नोव्हेंबरला साजरी होणार आहे. दीपावली (Deepavali 2020) सणापूर्वी येणाऱ्या वसुबारस या दिवसाचे विशेष महत्त्व (Vasu Baras 2020 Date and Significance) मानले जाते. त्याबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात त्यापैकी काही इथे.
अश्विन महिन्यात येणाऱ्या वद्य द्वादशीस गोवस्त द्वादशी असेही म्हटले जाते. ज्या दिवशी वसुबारस साजरी केली जाते. वसुबारसेला गोठ्यातील गाईची पूजा केली जाते. आख्यायिका सांगितली जाते की समुद्रमंधन केल्यानंतर पाच कामधेनू निर्माण झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक एक कामधेनू होती. या धेनूस उद्देशून वसूबारसेस हे व्रत केले केले जाते.
बसुबारसेच्या दिवशी गायी आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. या दिवशी दारासमोर रांगोळी काढली जाते. काही महिला या दिवशी उपवास करतात. या दिवशी या महिला प्रामुख्याने काही काही पदार्थ खात नाहीत. यात गहू, मूग यांसारख्या धान्य आणि कडधान्याचा समावेश होतो. व्रत पूर्ण झाल्यावर या महिला बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी याचे भोजन करुन उपवास सोडतात. (हेही वाचा, Dhanteras 2020 Rangoli Designs : धनत्रयोदशी दिवशी काढा या सोप्या आणि कमी वेळात काढता येतील अशा सुंदर रांगोळी )
आपल्या शेतीत भरपूर उत्पन्न व्हावे, पती, मुलाबालांना भरपूर दीर्घायू लाभावे अशी कामना करत सुवासीनी महिला या दिवशी मनोभावे पूजा करतात. बसुबारसेपासून दिवाळीचा उत्साह सुरु होतो. पुढे पुढे हा उत्साह अधिक रंगतदारहोत वाढत जातो. दिवाळीला गोडधोड केले जाते. तळलेले पदार्थ आणि मिठाई यांची रेलचेल असते.