Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

रतामध्ये मागील आठवड्याभरापासून दररोज 9 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण अवघ्या 24 तासामध्ये आढळत आहेत. आज आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, देशात 9996 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 357 जण दगावले आहेत. आता देशातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 286579 वर पोहचला आहे. त्यापैकी 137448 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 141029 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आजपर्यंत देशात 8102 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अशामध्ये देशातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. त्यामुळे आता देशात कोरोना व्हायरसचा कम्युनिटी स्प्रेड म्हणजेच समुह संसर्ग  झालाय का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतोय. अनेक तज्ञांनी याबद्दलची भीती बोलून दाखवली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार किती सहजरित्या होऊ शकतो हे Black Light Experiment द्वारे दाखवणारा व्हिडिओ व्हायरल (Watch Video).

जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या यादीत भारत दुसर्‍यास्थानी आहे. त्यामध्ये आपल्या देशात लोक दाटीवाटीने राहतात त्यामुळे कोरोनाचा फैलाव झपाट्याने होण्याची भीती फार पूर्वीच बोलून दाखवली होती. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकारदेखील अद्याप कम्युनिटी स्प्रेड झाला असल्याचं स्पष्ट सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्येही उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कम्युनिटी स्प्रेडची चर्चा फेटाळून लावली.

ICMR चा खुलासा

कम्युनिटी स्प्रेड म्हणजे नेमकं काय?

कम्युनिटी स्प्रेड म्हाणजे असा टप्पा जेव्हा कोरोनाबाधित रूग्णाला नेमका संसर्ग कुठे झाला त्याचा पत्ता लागत नाही. अशा परिस्थितीमध्ये संसर्ग ट्रेस करता येत नाही. हा टप्पा काळजीचा असतो कारण यामध्ये संसर्गाचा इतिहास समजत नाही. प्रवासात, संपर्कात आलेल्या व्यक्तींमधून नेमका कुठे धोका होता हे न समजणं म्हणजे सार्‍यांवरच या संसर्गाचा धोका असतो.

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील राज्यात कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन नसल्याचा दावा केला आहे. सुरूवाती पासूनच राज्याने टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसुत्रीवर भार दिल्याचं त्यांची नमुद केलं आहे.

भारतामध्ये खरंच कम्युनिटी स्पेड होण्यास सुरूवात झाली का?

सातत्याने कोरोनाबाधितांचा मोठा आकडा असल्याने आता हा कम्युनिटी स्पेड असू शकतो असा काहींचा अंदाज आहे. मात्र केंद्र सरकारकडून हा दावा वारंवार फेटाळण्यात आला आहे. तर काही एक्सपर्ट्सच्या मते आपण पुरेशा टेस्टिंग करत नसल्याने लवकर निदान होत नाही.

दरम्यान जगभरात धुमाकूळ घालणार्‍या या कोरोना व्हायरसवर अद्याप ठोस औषध किंवा लस नाही त्यामुळे आता सोशल डिस्टस्ट्न्सिंग पाळूनच या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यात सुरक्षितता आहे.