Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixarby)

भारतातील (India) कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आजही त्यात मोठी भर पडली आहे. मागील 24 तासांत देशात 9996 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 357 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या भरीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 286579 वर पोहचला आहे. त्यापैकी 137448 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 141029 रुग्णांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान देशात 8102 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिली आहे.

देशातील कोरोना बाधितांचा आकडा मोठा असला आणि त्यात सातत्याने भर पडत असली तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही चांगली आहे. त्यामुळे भारताचा रिकव्हरी रेट 48.88% इतका आहे. देशात महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू या राज्यांभोवती कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट आहे. त्यापाठोपाठ गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही कोरोना व्हायरसचे रुग्ण अधिक आहेत. (Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 94,041 वर; मागील 24 तासांत 3254 नवे रुग्ण तर 149 मृतांची नोंद)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसचा संसर्ग थोपवण्यासाठी 24 मार्चपासून लॉकडाऊनमध्ये असलेला देश जूनच्या पहिल्या आठवड्यापासून अनलॉक होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दरम्यान कोविड-19 चा धोका टळलेला नसल्याने सोशल डिस्टिसिंग पाळून इतर खबदारी घेणे आवश्यक आहे.