Spread of Coronavirus (Photo Credits: Youtube)

कोरोना विषाणूंनी जगभरात घातलेल्या धुमाकूळमुळे सध्या सर्वत्र कोविड 19 ची चर्चा आहे. कोरोना व्हायरस संबंधित विविध प्रकारची माहिती समोर येत असताना एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात सार्वजनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा प्रसार कसा होतो हे ब्लॅक लाईट्च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ जपान मधला असून यात एका व्यक्ती मार्फत दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग कसा होतो हे पाहायला मिळते. हा प्रयोग सार्वजनिक प्रसारण संस्था NHK यांनी काही आरोग्य तज्ज्ञांच्या मदतीने केला आहे.

एका रेस्टोरन्टमध्ये 10 लोक जातात. त्यात एक कोरोनाचा संसर्ग झालेली व्यक्ती देखील सहभागी असते. त्याच्याकडून कोरोना विषाणूंचा प्रसार कसा होतो हे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत पाहायला मिळते. या व्हिडिओत अंधारात चमकणारा भाग म्हणजे कोरोना विषाणू म्हणून दाखवण्यात आला आहे. यासाठी त्यांनी Invisible Fluorescent Paint चा वापर केला आहे. हे सर्वजण कोरोना संसर्ग किंवा इतर कोणत्याही विषाणूंच्या संसर्गाचा विचार न करता सामान्यपणे वावरत आहेत. रेस्टोरन्टमध्ये बुफेच्या माध्यमातून जेवण घेताना संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेल्या चमचाद्वारे देखील कोरोनाचा प्रसार होताना दिसत आहे.

व्हिडिओच्या शेवटी रेस्टोरन्टमध्ये आलेल्या सर्वांना ब्लॅक लाईट खाली ठेवण्यात आले आहे. त्यावेळेस चमकणारा प्रत्येक भाग म्हणजे 'विषाणूयुक्त.' असे चित्र व्हिडिओत दिसते. अन्न ठेवलेली भांडी, सहभागी झालेल्यांचे हात, चेहरे विषाणूयुक्त असल्याचे पाहायला मिळत आहे.

पहा व्हायरल व्हिडिओ:

 

कोरोना व्हायरसने सध्या भारतभर व्याप्ती वाढवली असल्याने कोरोना संसर्गाच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशाने लॉकाडाऊनचा मार्ग अवलंबला असला तरी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. तसंच सोशल डिस्टसिंगचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.