गोवा: माजी मंत्री जोस फिलिप डिसूझा यांचे थोरले भाऊ पास्कोल यांचे COVID19 मुळे निधन
Representational Image | (Photo Credits: PTI)

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. तर गोव्यात (Goa) ही दिवसागणिक नव्याने कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गोव्यात गेल्या 24 तासात 202 नवी कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. याच दरम्यान आता रविवारी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे युनिट अध्यक्ष आणि माजी मंत्री जोस फिलिप डिसूझा (Jose Phillip D'Souza)  यांचे थोरले भाऊ पास्कोल (Pascoal) यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. पणजी मधील एका कोविड रुग्णालयात पास्कोल यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची ही माहिती देण्यात आली आहे.(Coronavirus Update: भारतात आतापर्यंत कोविड-19 च्या एकूण 97,89,066 सॅपल टेस्ट- ICMR ची माहिती)

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पास्कल डिसूझा यांना गेल्या महिन्यातच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पास्कल यांना मारगाओ येथील ईएसआय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडत चालल्यानंतर आज त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे पास्कल यांच्या निधनानंतर गोव्यात कोरोना व्हायरसमुळे बळींचा आकडा 7 वर पोहचला आहे. शनिवार पर्यंत राज्यात एकूण 1648 कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत.(Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 6,73,165 वर; मागील 24 तासांत 24,850 नव्या रुग्णांची सर्वात मोठी भर तर 613 मृतांची नोंद)

शनिवारी गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी कोविड19 च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी बँकेची स्थापना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच गोव्यातील वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयांना आधीपासूनच अशा पद्धतीच्या बँक संचलनाची सुविधा आहे. तर कोविड19 मुळे प्रकृती सुधारलेल्या रुग्णांना कोरोनाबाधित रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन ही करण्यात येणार आहे.