Lok Sabha Election 2024 Phase 5 Live Updates: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीने बजावला मतदानाचा हक्क (Watch Video)
बातम्या
टीम लेटेस्टली
|
May 20, 2024 07:05 PM IST
Lok Sabha Election 2024: देशात 18 वी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतदान प्रकिया सात टप्प्यात पार पडत आहे. आज त्यातील पाचवा टप्पा आहे. या टप्प्यात आठ राज्यांतील लोकसभेच्या 49 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये 695 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आजच्या टप्प्यात मुंबई, लखनौ, रायबरेलीसह अनेक महत्त्वाच्या लोकसभा जागांवर निवडणुका होत आहे. या ठिकाणी आज अनेक केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील होणार आहे. यामध्ये लखनौमधून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रायबरेलीमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, कैसरगंजमधून ब्रिजभूषण यांचा मुलगा करण भूषण, मुंबई उत्तरमधून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, बारामुल्लामधून ओमर अब्दुल्ला, हाजीपूरमधून चिराग पासवान, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे कल्याण, तर लालूप्रसाद यांच्या कन्या रोहिणी आचार्य सारण इथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
आज महाराष्ट्रातील 13, उत्तर प्रदेशातील 14, पश्चिम बंगालमधील सात, बिहारमधील पाच, झारखंडमधील तीन, ओडिशातील पाच आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेवर मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि सायंकाळी 6 वाजता ते संपेल. या टप्प्यात मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार- मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघातील 7384 मतदान केंद्रांवर हे मतदान होत आहे.