Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा कोविड-19 (Covid-19) संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट (Trace, Test, Treat) या त्रिसुत्रीवर भर दिला जात आहे. दरम्यान 4 जुलै पर्यंत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (Indian Council of Medical Research) आतापर्यंत कोविड-19 च्या 97,89,066 सॅपल टेस्ट केल्या आहेत. त्यातील 2,48,934 नमुने कालच्या दिवसांत तपासण्यात आले आहेत. अशी माहिती ICMR ने दिली आहे.

भारतातील कोरोना बाधितांची संख्या 6 लाखांच्या पार पोहचली असून त्यात दिवसागणित मोठी भर पडत आहे. देशात महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू या भागांत सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्र प्रथमस्थानी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 10 लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार केला आहे. (भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 6,73,165 वर; मागील 24 तासांत 24,850 नव्या रुग्णांची सर्वात मोठी भर तर 613 मृतांची नोंद)

ANI Tweet:

दरम्यान कोरोना बाधितांचा आकडा 6,73,165 वर पोहचला आहे. त्यापैकी 2,44,814 अॅक्टीव्ह केसेसआहेत. म्हणजेच सध्या या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 4,09,083 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान देशात आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे 19,268 रुग्णांचा बळी गेला आहे.