Maharashtra Board HSC Result 2024: इयत्ता 12 वी परीक्षेचा उद्या जाहीर होणारा निकाल mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर कसा पाहाल? घ्या जाणून
निकाल । File Image

HSC,12th Exam Result 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 21 मे रोजी दुपारी 1 वाजता इयत्ता 12वी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणार आहे. हा निकाल विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वांसाठी खुला असेल. तसेच, mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थी त्यांचे गुण तपासू शकतील. एमएसबीएसएचएसई बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी आपले गूण पाहू शकतात, तसेच ते डाऊनलोडही करु शकतात. याबाबतची माहिती जाणून घ्या सविस्तर.

निकालाकडे विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष

यंदा बोर्ड परीक्षेत 12वी ला 14 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच 12वीच्या निकालावर त्यांचा करियर मधील पुढील प्रवास अवलंबून असल्याने या परीक्षेच्या निकालाकडे त्यांचं विशेष लक्ष आहे. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान बोर्डाची बारावीची परीक्षा झाली आहे. बारावीचे विद्यार्थी mahresult.nic.in वर किंवा बोर्डाने उपलब्ध केलेल्या अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वर निकाल पाहू शकतील. त्यासाठी त्यांना रोल नंबर आणि आईचे नाव हे तपशील अपलोड करावे लागतील त्यांनंतर त्यांचा निकाल पाहता येईल. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना किमान 35% मार्क्स प्रत्येक विषयात आवश्यक आहेत. (हेही वाचा, Maharashtra HSC Result 2024 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा! उद्या, 21 मे रोजी जाहीर होणार निकाल, mahahsscboard.in वर पाहू शकाल)

12वीचा निकाल ऑनलाईन कसा पहाल?

  • बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेज वर 12वी निकालाचा पर्याय निवडा.
  • आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करायचं आहे.
  • त्यापुढे View Result वर क्लिक करा.
  • तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
  • तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.

पाठीमागील वर्षातील निकालाची पार्श्वभूमी

दरम्यान, 2023 मध्ये, 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान झालेल्या परीक्षांचे निकाल 25 मे रोजी दुपारी 2 वाजता घोषित करण्यात आले. या वर्षी, HSC परीक्षेसाठी एकूण 15,13,909 उमेदवारांनी नोंदणी केली, ज्यात 8,21,450 मुले आणि 6,92,424 मुली होत्या. विज्ञान शाखेत सर्वाधिक 7,60,046 नोंदणी झाली, त्यानंतर कला शाखेत 3,81,982 आणि वाणिज्य शाखेत 3,29,905 नोंदणी झाली. या परीक्षेत 3,320 केंद्रांवर 1.80 लाख कर्मचारी सहभागी झाले होते. गतवर्षी कोकण जिल्ह्याने सर्वाधिक ९६.०१ टक्के उत्तीर्ण झाले होते. मागील वर्षी बारावीचा निकाल 91.25% लागला होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो जाहीर करण्यात आला होता. यंदाच्या वर्षीही इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या जवळपास तिसऱ्या आठवड्यात लागत आहे.