इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं भारतात उद्या (21 मे) एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं उद्या देशभरात भारताचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी(Ebrahim Raisi)यांचा हेलिकॉप्टर अपघातात(Helicoptoer Crash) मृत्यू झाला आहे. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्री होते. त्यांचाही मृत्यू झाल्याचे समजते आहे. इराणी(Iran) माध्यमांनी इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूचा दावा केला आहे. अपघात स्थळी हेलिकॉप्टरचा ढाचा देखील आढळल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा - Ebrahim Raisi: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, परराष्ट्र मंत्री आणि इतर अधिकाऱ्यांचाही समावेश)
पाहा पोस्ट -
Iran President Ebrahim Raisi, Foreign Minister have passed in a helicopter crash, as a mark of respect to the departed dignitaries Government of India has decided that there will be one day's state mourning on 21st May throughout india. On the day of mourning, the national flag…
— ANI (@ANI) May 20, 2024
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला रविवारी अपघात झाला होता. त्यानंतर ते आपत्कालीन परिस्थितीत उतरवण्यात आले. पूर्व अझरबैजान प्रदेशात हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग करण्यात आली होती.
इराणचे रेड क्रिसेंटच्या प्रमुखांनी सांगितलं की, रेस्क्यू टीम दुर्घटनास्थळी पोहोचली आहे. तसेच हेलिकॉप्टरच्या ढाच्याजवळ पोहोचली आहे. आम्हाला रेस्क्यू टीमकडून काही व्हिडिओ मिळाले आहेत. हेलिकॉप्टर जळून खाक झाले आहे. घटनास्थळावर कोणी जिवंत असल्याचे आढळून आलेले नाही. इराणच्या माध्यमांचा दावा आहे की, हेलिकॉप्टर दुर्घटनास्थळी कोणतीही व्यक्ती जीवंत आढळलेले नाही.