आज कोल्हापूरसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या गडगडाटामध्ये वादळी पावसाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यात आज वादळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या गडगडाटामध्ये पावसाला सुरुवात झाली. यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. कसबा बावडा ते वडणगे रस्त्यावर सुद्धा झाडांसह वीजेचे खांब वादळामुळे मोडून पडले आहेत. वडणगे स्मशानभूमीचे छतही सुद्धा उडून गेलं आहे. (हेही वाचा - Chiplun Rains: चिपळूण मध्ये अडरे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस; मे महिन्यात अर्धा तासात दुथडी भरून वाहल्या नद्या !)
छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार तडाखा दिला.करमाड, शेकटा,आणि करंजगाव शिवारात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. बिडकिन शिवारात अवकाळीचा फटका शेतकऱ्यांच्या पपई च्या बागाना बसला असून हे पीक आडवे झाले आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
बिडकिन शिवारात अवकाळीचा फटका शेतकऱ्यांच्या पपई च्या बागाना बसला असून हे पीक आडवे झाले आहेत. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.उन्हाळी पिकांना देखील याचा मोठा फटाका बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी अधिक होत असतानाच उकाडा मात्र कायम आहे. दरम्यान, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.