भरधाव वेगात असलेल्या आपल्या आलीशान पोर्शे गाडीने धडक देऊन दोन निष्पापांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी हा पुणेस्थित एका बिल्डरचा मुलगा आहे. आरोपीचे वय 18 वर्षांपेक्षा चारच महिन्यांनी कमी आहे. त्यामुळे त्याला अल्पवयीन संबोधले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये त्याची भरधाव कार रस्त्यावर लोकांना चिरडताना दिसते आहे. कथीतपणे सांगितले जात आहे की, व्हिडिओत दिसणारी कार ही आरोपीचीच आहे. (हेही वाचा - Pune Crime: आलिशान पोर्शे कारने दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डर पुत्राचे पोलिसांकडून चोचले, आरोपीसाठी पिझ्झा बर्गरची खास सोय)

एक्स व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)