Kerala Shocker: मालमत्तेच्या वादातून 71 वर्षीय व्यक्तीने केली आपल्या 64 वर्षीय पत्नीची हत्या; स्वतः पोलिसांकडे जाऊन दिली गुन्ह्याची कबुली
हल्ला | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Elderly Man Stabs Wife: मालमत्तेच्या वादातून एका वृद्ध जोडप्यामध्ये मतभेद झाल्यानंतर, पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना केरळमधून (Kerala) समोर आली आहे. वृत्तानुसार, रविवारी संध्याकाळी शाब्दिक द्वंद्वानंतर, चिडलेला 71 वर्षीय जोसेफ हा स्वयंपाकघरात गेला आणि चाकू घेऊन बाहेर आला. त्यानंतर त्याने त्याची 64 वर्षीय पत्नी लीला हिचा गळा कापला.

पत्नीने शेवटचा श्वास घेतल्याची खात्री केल्यानंतर, जोसेफने कपडे घातले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ख्रिश्चन कबरीजवळ मेणबत्ती पेटवल्यानंतर तो पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जेव्हा पोलीस त्यांच्या घरी आले तेव्हा जोसेफने पत्नीची हत्या केल्याचे शेजाऱ्यांना समजले. या जोडप्याला तीन मुले असून ती सर्व परदेशात स्थायिक आहेत. दोघेही काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियात त्यांच्या मुलाच्या घरी राहून परत आले होते. जोसेफ आणि लीला यांच्यात प्रथमच मालमत्तेवरून मतभेद झाल्याचे समजते.

दरम्यान, सीकरमधील दंतारामगड येथील सुरेरामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. या ठिकाणी 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. पोलिसांनी 24 तासांत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. पत्नीचा खून केल्याच्या आरोपावरून मृत महिलेच्या पतीला अटक करण्यात आली. काळूराम मीणा असे आरोपीचे नाव आहे. जोडप्यामधील भांडणानंतर आरोपीने पत्नी शरबतीदेवी हिच्या डोक्यावर धारदार कुऱ्हाडीने तीन वार केले. (हेही वाचा: Chhattisgarh Kawardha Road Accident: छत्तीसगडमध्ये पिकअप उलटून 18 आदिवासींचा मृत्यू: मृतांमध्ये 16 महिलांचा समावेश)

या प्रकरणाबाबत मयत वृद्ध महिला शरबती देवी यांचा दीर छेतरमल मीणा यांनी त्यांचा भाऊ काळुराम मीणा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वृद्ध महिलेचा पती आरोपी काळुराम याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, पती-पत्नीमधील वादातून आरोपीने खून केल्याची कबुली दिली.