Lok Sabha Election 2024: भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क, पहा व्हिडिओ
Akshay Kumar (PC - X/ANI)

Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू असून अनेक कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) ने सोमवारी पहिल्यांदा मतदान केले. मीडियाशी संवाद साधताना अक्षय कुमारने ऑगस्ट 2023 मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मतदान केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी अक्षय कुमार म्हणाला की, 'माझा भारत विकसित आणि मजबूत व्हावा अशी माझी इच्छा आहे. हे लक्षात घेऊन मी मतदान केले. भारताने मतदान केले पाहिजे. मला वाटतं मतदानाचा टक्का चांगला असेल.'

अक्षय कुमारला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले होते. याआधी त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व होते. सोशल मीडियावर नागरिकत्व प्रमाणपत्र शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले होते की, हृदय आणि नागरिकत्व दोन्ही हिंदुस्थानी आहेत. आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024 Phase 5 Live Updates: अभिनेत्री व खासदार Hema Malini आणि मुलगी Esha Deol यांनी मुंबईमध्ये बजावला मतदानाचा हक्क)

पहा व्हिडिओ -

पाचव्या टप्प्यात 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 49 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. ज्या 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5 व्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यामध्ये बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.