Free Sunscreen in Netherland: नेदरलँड सरकारकडून नागरिकांना विनामूल्य सनस्क्रीनचा पुरवठा; वेंडिंग मशीनजवळ नागरिकांची गर्दी, नेमक प्रकरण काय?
Photo Credit -X

Free Sunscreen in Netherland: नेदरलँड्समध्ये नागरिकांसाठी शाळा-विद्यापीठे, उद्याने, प्ले ग्राउंड आणि खुल्या सार्वजनिक ठिकाणी सनक्रीम(Sunscreen) डिस्पेंसर उपलब्ध करून दिले गेले आहेत. फ्री मध्ये सनक्रीमचा पुरवठा करण्याची घोषणा नुकतीच सरकारडून करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करत सरकारने अनेक ठिकाणी सनक्रीम डिस्पेंसर उभारले आहेत. नेदरलँड्समध्ये त्वचेच्या कर्करोगा(Skin Cancer)च्या वाढत्या संख्येचा सामना करण्यासाठी, नेदरलँड सरकारने 2023 मध्ये आपल्या नागरिकांना मोफत तीव्र सूर्य किरणांपासून संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. (हेही वाचा:Human City On Mars: मंगळावर 30 वर्षांत मानवी शहर वसणार! एलोन मस्क यांनी केली भविष्यवाणी )

त्यावर उपाययोजना करत आता नेदरलँड सरकारने, सार्वजनिक उद्यानात मोफत सनस्क्रीन व्हेंडिंग मशीनची उभारणी केली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत, व्हेंडिंग मशीनमध्ये निव्हिया सनस्क्रीनचा साठा केल्याचे दिसते आणि लोक ते स्वतःवर लावण्यासाठी व्हेंडिंग मशीनकडे वळत असल्याचे दिसत आहेत.

एक्सवर वापरकर्त्यांनी प्रतिक्रीया व्यक्त करताना असे लिहिले की, "ज्याने याचा विचार केला तो चांगल्या गोष्टीसाठी पात्र आहे"."मला नेमके ठिकाण सांगा, माझ्याकडे काही रिकाम्या बाटल्या भरायच्या आहेत," असे दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे. "भारतात, लोक मशीन थेट त्यांच्या घरी घेऊन जातील," असे तिसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे. 'आम्हाला माझ्या देशात याची गरज आहे, येथे सनस्क्रीन खूप महाग आहे आणि तेथे खूप कठोर सूर्य किरण आहेच,' असे तिसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे. "हे अविश्वसनीय आहे, मला आशा आहे की जेव्हा सनस्क्रीन संपेल. तेव्हा ते पुन्हा भरण्याची खात्री करतील," एक वापरकर्त्याने म्हटले. "भविष्यात नेदरलँड्सला भेट देण्याची ही माझी खूप इच्छा आहे." असे पाचव्या व्यक्तीने प्रतिक्रीयेत लिहिले आहे.