Chudidar Gang in Hyderabad: हैदराबादमध्ये सध्या महिलांच्या वेशात चोरट्यांनी दहशत माजवली आहे. सीसीटीव्हीमध्ये ही ‘चुडीदार गँग’ कैद झाली. हैदराबादमध्ये महिलांच्या वेशातील चोरटे मोकाट सुटले आहे. एसआर नगरमध्ये त्यांच्या ताज्या घरफोडीनंतर खळबळ उडाली आहे. त्यांच्या विशिष्ट पोशाखामुळे त्यांना 'चुडीदार गँग' म्हणून ओळखले जाते. हे गुन्हेगार चुडीदार परिधान करून अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये चोरी करताना आढळले आहेत.

अहवालानुसार, आकृती आर्केड अपार्टमेंट, चेक कॉलनी येथील के. व्यंकटेश्वर राव हे 18 मे रोजी रात्री आपल्या घराला कुलूप लावून, कुटुंबासह ओंगोल येथे गेले होते. शनिवारी सकाळी घरातील मोलकरीण आली असता तिला घराचे कुलूप तुटल्याचे दिसले. त्यानंतर राव यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस तपासात असे दिसून आले की, चुडीदार परिधान केलेले आणि मुखवटे घातलेले दोन हल्लेखोर 18 मे रोजी पहाटे अपार्टमेंटमध्ये घुसले होते. चोरट्यांनी चार तोळे सोने, 1 लाख रोख आणि लॅपटॉप अशी चोरे केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे. (हेही वाचा: Bride's Ex-Lover Attacks Groom: लग्नमंडपात एक्स बॉयफ्रेंडकडून नवरदेवावर चाकूने हल्ला, हल्लेखोर फरार, राजस्थानमधील घटना)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)