Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad, TATA IPL 2025 65th Match आयपीएल 2025 चा हा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आजचा सामना टॉप 2चे चित्र बदलू शकतो. या हंगामातील 65 वा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (SRH vs RCB) यांच्यात लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळवला जात आहे. आरसीबीने आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे पण जर त्यांना टॉप 2 मध्ये राहायचे असेल तर या सामन्यात विजय आवश्यक आहे. हैदराबाद आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी, त्यांना सन्मानजनक विजयासह स्पर्धेतून बाहेर पडायचे आहे. दरम्यान, आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात जितेश शर्मा आरसीबीचे नेतृत्व करेल. तर रजत पाटीदार हा एक प्रभावशाली खेळाडू म्हणून पाहिला जाईल.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकीपर), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, लुंगी एनगिडी, सुयश शर्मा

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)