Mumbai Lok Sabha Elections 2024: शिवसेना (UBT) गटातील 62 वर्षीय मतदान केंद्र प्रतिनिधी सोमवारी (20 मे) मुंबईतील वरळी येथील मतदान केंद्राच्या शौचालयात मृतावस्थेत (Polling Agent Dies) आढळून आला. नोहर नलगे असे या प्रतिनीधीचे नाव आहे. तो ठाकरे गटाचा कट्टर कार्यकर्ता होता. सदर घटनेप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने निवडणूक आयोगास जबाबदार धरले आहे. पक्षने म्हटले आहे की, मतदान केंद्रावरील इतर अनेक अधिकाऱ्यांप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या पोलिंग एजंटला अस्वस्थ वाटले. तीव्र उष्णता आणि उष्ण हवामान काळात ज्येष्ठ नागरिक आणि मतदारांवर अचानक ओढवणाऱ्या परिस्थितीसाठी पर्यायी वैद्यकीय कोणतीच मदत उपलब्ध नव्हती. मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरल्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) दोषी असल्याचेही पक्षाने म्हटले आहे.
ECI अधिकारी देखील अति उष्णतेमुळे बेशुद्ध- रिपोर्ट
शिवसेना (UBT) गटाने दावा केला आहे की, मनोहर नलगे आणि इतर अनेक अधिकाऱ्यांसह मृत व्यक्तीला मतदान केंद्रावर योग्य वायुवीजन नसल्यामुळे अस्वस्थ वाटले. रिपोर्ट्सनुसार, एक ECI अधिकारी देखील अति उष्णतेमुळे बेशुद्ध झाला. वरळीजवळील बीडीडी चाळ येथील रहिवासी असलेले नलगे पक्षकर्यासाठी या परिसरातील मतदान केंद्रावर तैनात होते. स्वस्थता अनुभवल्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. धक्कादायक म्हणजे सुमारे 5:45 वाजता हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी नलगे यांना मृत घोषित केले. (हेही वाचा, Election Commission Clarification On Polling In Mumbai: मुंबईमध्ये मतदान केंद्रावर रांगाच रांगा, निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण; उद्धव ठाकरे यांचा घणाघात, वाचा सविस्तर)
पोलिंग एजंट नलगे अनेक वर्षांपासून शिवसेनेशी संबंधित
शिवसेनेने (यूबीटी) जोर दिला की, पक्षाचे दीर्घकाळ पोलिंग एजंट असलेले नलगे हे अनेक वर्षांपासून शिवसेनेशी संबंधित होते. या घटनेने निवडणुकीदरम्यान मतदान केंद्र एजंट आणि अधिकाऱ्यांच्या कल्याण आणि कामाच्या परिस्थितीबद्दल चिंता निर्माण केली आहे, ज्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांकडून चांगल्या सुविधा आणि समर्थनासाठी आवाहन करण्यात आले. (हेही वाचा, Election Commission of India : निवडणूक आयोगाकडून दाखल झालेल्या 425 तक्रारींपैकी 90% तक्रारींचे निराकरण; गेल्या दोन महिन्यांतील आकडेवारी जाहीर)
दरम्यान, मुंबईतील सायन परिसरात असलेल्या लिटल एंजल स्कूलमध्ये सुरू असलेल्या मतदानादरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. भाजप कार्यकर्त्यांनी असा दावा केला की ते मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर मतदारांना मतदानाच्या स्लिप देत होते, ज्यावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि आरोप केला की भाजपचे लोक मतदान केंद्राजवळ जाऊन मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहेत. यानंतर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आणि भाजपने दावा केला की त्यांनी दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, भाजप कार्यकर्त्याच्या तक्रारीच्या आधारे, सायन पोलिसांनी भादंवि कलम 506 (2) अन्वये दोन अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.