Lockdown: मध्य प्रदेशातील भाजप आमदाराने मागीतली अभिनेता सोनू सूद याच्याकडे मदत, काँग्रेसचे टीकास्त्र
Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील भाजप (BJP) आमदार, माजी मंत्री राजेंद्र शुक्ल यांनी लॉकडाऊन (Lockdown) काळात मुंबईत अडकलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) यांच्याकडे मदत मागितली आहे. हे सर्व कामगार राजेंद्र शुक्ला यांच्या विधानसभा मतदारसंघातील आहेत. शुक्ला यांनी सोनू सूदकडे मदत मागितल्यावरुन काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, राज्यातील शिवराज सरकार लाखो स्थलांतरित कामगारांना आपल्या मूळ गावी आणल्याचा दावा करत आहे. परंतू, त्यांच्याच आमदाराला सोनू सूद यांच्याकडे मदत मागावी लागते आहे.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनी भाजप विधायक राजेंद्र शुक्ल यांच्या ट्विटला रिट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की 'हे ट्विटर मध्य प्रदेश राज्यातील कटू सत्यच उजेडात आणते आहे. शिवराज जी पाहा, माजी मंत्री रीवाचे विद्यमान आमदाराचाच आपल्या सरकारवर विश्वास नाही. त्यांनी मुंबईत अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी अभिनेता सोनू सूद यांच्याकडे मदत मागितली आहे. '

यादव यांनी राजेंद्र शुक्ल यांचे ते ट्विट रीट्विटही केले आहे, ज्यात म्हटले आहे की, सोनू सूद जी, रीवा आणि सतना येथील अनेक रहिवासी प्रदीर्घ काळापासून मुंबईत अडकले आहेत. अजूनही ते परत आले नाहीत. कृपा करुन त्यांना परत आणण्यासाठी मदत करा. त्यानंतर त्यांनी सोनू सूद याला धन्यवाद देत म्हटले आहे की, धन्यवाद सोनू सूदजी विद्य च्या पावन भूमीत आपले स्वागत आहे. मुंबईमध्ये अजूनही 168 पैकी सुमारे 55 लोक आपण पाठवले आहेत. अजूनही 113 लोक बाकी आहेत. त्यांना पाठविण्यासाठी मी आपल्याला धन्यवाद देतो.. आपल्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.