
IND vs PAK, Asia Cup 2025: यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कप २०२५ मध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बराच गोंधळ घातला होता. मात्र, शेवटी यूएई विरुद्धचा सामना खेळून पाकिस्तानने सुपर-४ मध्ये स्थान मिळवले आहे. यासह, स्पर्धेतील सुपर-४ मध्ये पोहोचणाऱ्या तीन संघांची नावे निश्चित झाली असून, त्यामुळे टीम इंडियाचे पुढील वेळापत्रकही जवळपास समोर आले आहे. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा थरार अनुभवता येणार आहे. PAK vs UAE: कोणाचा राग कोणावर? पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्यात मारला चेंडू, पाहा VIDEO
ग्रुप-बीमधील समीकरणे अजूनही गुलदस्त्यात
आशिया कप २०२५ मधील ग्रुप स्टेज अजून संपलेला नाही. ग्रुप-ए मधून टीम इंडिया आणि पाकिस्तानने पात्रत मिळवली आहे, पण ग्रुप-बीमधील लढाई अजूनही सुरू आहे. १८ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात मोठा सामना खेळला जाईल. अफगाणिस्तानसाठी हा सामना 'करो वा मरो'चा असणार आहे. सुपर-४ मध्ये जाण्यासाठी त्यांना फक्त विजय मिळवणे आवश्यक आहे. दुसरीकडे, जर श्रीलंकाला सुपर-४ मध्ये आपली जागा पक्की करायची असेल, तर त्यांना मोठ्या फरकाने हरण्यापासून वाचणे गरजेचे आहे. जर ते ७० हून कमी धावांनी किंवा १३ षटकांच्या आत हरले, तरी ते सुपर-४ मध्ये जातील. या सामन्याच्या निकालावर बांगलादेशचे भवितव्यही अवलंबून आहे.
भारत-पाकिस्तानचा महामुकाबला कधी होणार?
आता जर अफगाणिस्तानने हा सामना जिंकला, तर बांगलादेश स्पर्धेतून बाहेर होईल. अशा परिस्थितीत, टीम इंडियाच्या सुपर-४ वेळापत्रकाबाबत बोलायचं झाल्यास, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला २१ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा खेळला जाईल. त्यानंतर, टीम इंडिया २४ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी ग्रुप-बी मधून पात्र ठरलेल्या इतर दोन संघांविरुद्ध (श्रीलंका, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश) सामने खेळेल.