
IND vs OMA Weather Report: आशिया कप २०२५ मध्ये (Asia Cup 2025) सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. ग्रुप-ए मधील आपले सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडियाने सुपर-४ मधील जागा आधीच निश्चित केली आहे. आता भारतीय संघाचा ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना ओमान सोबत होणार आहे. हा सामना अबु धाबीतील शेख जायद स्टेडियमवर होणार असून, या सामन्यात येथील हवामान संघांसाठी मोठे आव्हान ठरू शकते. Asia Cup 2025: सुपर-४ मधील सर्व संघ निश्चित, नोट करुन घ्या भारताचे सामने कधी अन् कोणत्या संघांसोबत होणार?
खेळाडूंना उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागेल
टीम इंडियाने आपले सुरुवातीचे दोन्ही सामने दुबईच्या स्टेडियमवर खेळले. आता तिसरा सामना अबु धाबीच्या मैदानावर होणार आहे. अॅक्युवेदरच्या अहवालानुसार, या सामन्यादरम्यान तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, हवेतील आर्द्रता सुमारे ६० टक्के असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे खेळाडूंना उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागेल. या सामन्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही, तर वाऱ्याचा वेग १७ किलोमीटर प्रति तास राहू शकतो.
स्टेडियमचा टी-२० रेकॉर्ड काय सांगतो?
अबू धाबीतील शेख जायद स्टेडियमच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या रेकॉर्डनुसार, येथे आतापर्यंत एकूण ७४ सामने खेळले गेले आहेत.
- प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला: ३२ सामन्यांत विजय मिळाला आहे.
- लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला: ४२ सामन्यांत विजय मिळाला आहे.
या आकडेवारीनुसार, येथील खेळपट्टी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांसाठी अधिक फायदेशीर ठरते. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १४५ ते १५० च्या दरम्यान आहे. भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत फक्त एक टी२० सामना खेळला आहे, ज्यात त्यांना विजय मिळाला होता.